Team India Head Coach: भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी (Team India Head Coach) अनेक नावे पुढे येत आहेत. याचदरम्यान रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर आणि अॅन्डी फ्लॉवर या तीन दिग्गजांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नकार दिला. रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर आणि अॅन्डी फ्लॉवर हे सध्या आयपीएलमधील संघाच्या प्रशिक्षपदाच्या भूमिकेत होते. यावेळी त्यांना माध्यमांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत विचारले असता तिघांनी जाहीरपणे नकार दिला. 


भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याचा आपला कुठलाही विचार नाही, असं बंगळुरुचे प्रशिक्षक अॅन्डी फ्लॉवर यांनी सांगितले. तर माझी जीवनशैली फिट नाही, असे त्यांनी कारण दिले. राष्ट्रीय संघाचा वरिष्ठ कोच बनणे पसंत आहे. मात्र, आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असून, घरीदेखील वेळ देऊ इच्छितो, असं रिकी पाँटिंग म्हणाला. तसेच चार वर्षे मी ऑस्ट्रेलियन संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. हे खूप व्यापक आणि थकवणारे काम आहे. भारतीय संघावर विजयासाठी खूप दबाव आहे, असं जस्टीन लँगर यांनी सांगितले.


रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर आणि अॅन्डी फ्लॉवर यांच्या विधानावरुन आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भाष्य केलं. एएनआईच्या वृत्तानूसार जय शाह म्हणाले की, जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलतो, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यापेक्षा प्रतिष्ठेचे कोणतेही पद असू शकत नाही. टीम इंडियाचे जगभरात मोठ्या संख्येने चाहते आहेत. त्यामुळे बीसीसीआय योग्य उमेदवाराची निवड करेल. बीसीसीआयने एकाही ऑस्ट्रेलियनला प्रशिक्षकपदाची ऑफर दिलेली नाही. व्हायरल होत असलेलं वृत्त चुकीचं आहे, असं जय शहा यांनी स्पष्ट केलं. 






नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ किती?


टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होईल, जो 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.


संबंधित बातम्या:


Team India Head Coach: स्टीफन फ्लेमिंगला टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचे आहे? चेन्नईच्या CEO ने केला धक्कादायक खुलासा!


Hardik Pandya and Natasa Stankovic: हार्दिक पांड्या अन् नताशाचा घटस्फोट होणार?; 4 घडामोडींनी वेधलं लक्ष, सोशल मीडियावर चर्चांना उधाण!