एक्स्प्लोर

ICC चा क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा निर्णय! 6 वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेट बोर्डाला अचानक केलं सस्पेंड, कारण काय?

ICC Suspends Canada Cricket Board : आयपीएल 2026 चा थरार संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या बोर्ड बैठकीत एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला निर्णय घेतला आहे.

ICC Suspends Canada Cricket Board : आयपीएल 2026 चा थरार संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपल्या बोर्ड बैठकीत एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला निर्णय घेतला आहे. आयसीसीने कॅनडा क्रिकेट (Cricket Canada) या संस्थेची सदस्यता तत्काळ प्रभावाने निलंबित केली आहे. विशेष म्हणजे, कॅनडाची राष्ट्रीय क्रिकेट संघटना निलंबित करण्यात आली असली तरी कॅनडाच्या राष्ट्रीय संघांना आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आलेली नाही.

आयसीसीने का घेतला हा निर्णय? (Why ICC Suspends Canada Cricket Board)

आयसीसीच्या माहितीनुसार, क्रिकेट कॅनडाने सदस्यत्वाशी संबंधित काही गंभीर जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केले आहे. यामुळे प्रशासन आणि कारभाराशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आयसीसी बोर्डाने कठोर भूमिका घेत कॅनडाच्या क्रिकेट संस्थेवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, आयसीसीने नेमक्या कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. विविध अहवालांनुसार, क्रिकेट कॅनडाच्या स्थानिक व्यवस्थापनात आणि प्रशासनात गंभीर त्रुटी असल्याची चर्चा सुरू होती.

खेळाडूंना दिलासा, विश्वचषक खेळण्यावर बंदी नाही (Canada Cricket Board)

आयसीसीने हा निर्णय घेताना कॅनडाच्या क्रिकेटपटूंना कोणताही अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळे निलंबनाचा फटका थेट राष्ट्रीय संघाला बसणार नाही. याचा अर्थ असा की, निलंबनाच्या कालावधीतही कॅनडाचे पुरुष, महिला आणि युवा राष्ट्रीय संघ आयसीसीच्या अधिकृत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र राहतील. त्यामुळे आगामी आयसीसी स्पर्धांमध्ये कॅनडाचा सहभाग कायम राहणार आहे.

निधी मिळणार, पण आयसीसीच्या देखरेखीखाली (Canada Cricket Board News)

निलंबनानंतर क्रिकेट कॅनडाला आयसीसीकडून मिळणारा निधी पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. मात्र, हा निधी आता आयसीसीच्या थेट देखरेखीखाली नियंत्रित पद्धतीने दिला जाणार आहे. हा निधी केवळ राष्ट्रीय संघांच्या कार्यक्रमांसाठी आणि क्रिकेटच्या विकासासाठीच वापरता येईल. यासाठी आयसीसी व्यवस्थापन आणि विशेष समिती संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. आयसीसीने स्पष्ट केले आहे की, क्रिकेट कॅनडाला प्रशासन आणि सुशासनाशी संबंधित काही अटी पूर्ण कराव्या लागतील. त्या अटींची पूर्तता झाल्यानंतरच सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याचा विचार केला जाईल.

यापूर्वी अमेरिकेवरही झाली होती कारवाई

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी क्रिकेट यूएसए (USA Cricket) वरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील क्रिकेट प्रशासनाबाबत आयसीसी अधिक कठोर भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

6 वेळा विश्वचषक खेळलेला कॅनडा (Canada Cricket ICC News)

कॅनडा हा सहयोगी सदस्य देशांमधील क्रिकेटमधील एक जुना आणि महत्त्वाचा संघ मानला जातो. कॅनडाने आतापर्यंत एकूण 6 ICC विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे.  कॅनडा 2024 आणि 2026 च्या टी-20 विश्वचषक संघांचा भाग होता. या संघाने चार एकदिवसीय विश्वचषकांमध्येही भाग घेतला आहे. कॅनडाने 1979, 2003, 2007आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला होता. क्रिकेट कॅनडाला 1968 मध्ये आयसीसीचे सहयोगी सदस्यत्व मिळाले. त्यामुळे हा क्रिकेट इतिहासातील सर्वात जुन्या सहयोगी सदस्यांपैकी एक देश मानला जातो.

हे ही वाचा -

Vaibhav Sooryavanshi VIDEO : काळा मास्क, चेहऱ्यावर टॉवेल अन् वैभवची लपूनछपून एन्ट्री!; एअरपोर्टवरील लूकची सोशल मीडियावर चर्चा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
Embed widget