ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) 6 डिसेंबर रोजी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी 'प्लेअर ऑफ द मंथ'साठी नामांकित खेळाडू जाहीर केले होते. दरम्यान आयसीसीने आपल्या सोशल मीडियाद्वारे महिला आणि पुरुष अशा दोन्ही खेळाडूंच्या नावांसहित फोटोंची पोस्ट शेअर केली होती. पण हे पोस्टर शेअर करणं आयसीसीला एका चूकीमुळं महाग पडलं आयसीसीच्या एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर चांगलच ट्रोल केलं.
महिला नॉमिनीजची पोस्ट शेअर करताना आयसीसीने चुकून महिलांच्या फोटोंच्या खाली पुरुषांची नावे लिहिली होती. आयसीसीची ही मोठी चूक नेटकऱ्यांनीही लगेच पकडली. ज्यानंतर त्यांना चांगलच ट्रोल करण्यास नेटीजन्सनी सुरुवात केली. तीन महिला क्रिकेटपटूंना 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'साठी नामांकन मिळाले होते. यात पाकिस्तानची खेळाडू सिद्रा अमीन, थायलंडची नथकन चंथम आणि आयर्लंडची गॅबी ल्यूईस यांचा समावेश आहे. पण या महिला खेळाडूंच्या फोटोंटी पोस्ट शेअर करताना आयसीसीने पुरुष क्रिकेटपटूंची नावे लिहिली होती. या पोस्टरमध्ये सिद्रा अमीनच्या जागी जॉस बटलर, नट्टाकन चँथमच्या जागी आदिल रशीद आणि गॅबी लुईसच्या जागी शाहीन आफ्रिदी अशी नाव लिहिण्यात आली. आयसीसीने ही चूक कळून येत्याच पोस्ट डिलीट करुन नवी पोस्ट केली पण तोवर संबधित पोस्ट बरीच व्हायरल झाली होती.
सिद्रा अमीननेही केलं आयसीसीला ट्रोल
महिला खेळाडूंमध्ये नामांकन मिळालेल्या पाकिस्तानच्या सिद्रा अमीननेही आयसीसीच्या या चुकीवर त्यांना ट्रोल केलं. तिने तिच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत लिहिलं की, "मी आणि जोस बटलर जुळे आहोत हे माहित नव्हतं." यासोबतच तिने हसणारा इमोजीही शेअर केला. या ट्विटमध्ये सिद्रा अमीनने तोच फोटो वापरला होता ज्यामध्ये आयसीसीने चूक केली होती.
हे देखील वाचा-