India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु असून त्यानंतर दोन्ही संघ दोन कसोटी सामने खेळणार आहेत. कसोटी मालिका बुधवारपासून (14 डिसेंबर) सुरू होणार आहे. बांगलादेशने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये झाकीर हसन (Zakir Hasan) याचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुशफिकुर रहीम, यासिर अली आणि तस्किन अहमद यांनाही कसोटी संघात संधी दिली गेली आहे. त्याचबरोबर संघाची कमान शाकिब अल हसनकडे सोपवण्यात आली आहे.

झाकीर हसनने यापूर्वी बांगलादेशकडून टी-20 सामना खेळला आहे. त्याने 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आता पुन्हा त्याचा राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. झाकीर हसनबद्दल बोलताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता मिन्हाजुल म्हणाले, "झाकीरसाठी, आम्हाला वाटते की तो कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमित कामगिरी करत आहे."

असा आहे बांगलादेशचा संघ

शाकीब अल हसन (कर्णधार) महमुदुल हसन, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नूरुल हसन, इबत हुसैन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकुर रहिम, तस्किन अहमद. रहमान रझा, अनामूल हक. 

कसा आहे भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार)/ अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.  

भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर  झहूर अहमद चौधरी स्टेडियम
दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका

हे देखील वाचा-

Rohit Sharma : रोहित दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार? या खेळाडूला मिळू शकते संधी