India vs Bangladesh 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. पण दौऱ्यातील कसोटी मालिकीपूर्वीच कर्णधार रोहितला दुखापत झाली, ज्यामुळे आता कसोटी मालिकेत त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हा प्रश्न सर्वांसमोर आला आहे. अशावेळी रोहितच्या जागी सलामीला युवा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याला संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.
बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील दोन सामने झाले असून एक सामना शिल्लक आहे. ज्यानंतर टीम इंडिया 14 डिसेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण यापूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाताला दुखापत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसऱ्या वन-डे दरम्यान रोहितला फिल्डिंग करताना दुखापत झाली, त्यानंतरही तो फलंदाजीला आला होता, पण आता तिसऱ्या सामन्यात आणि त्यानंतर कसोटी मालिकेत रोहितला विश्रांती दिली जाऊ शकते. अशावेळी त्याच्या जागी युवा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याला संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगतिले की, ''अभिमन्यू ईश्वरनने भारत अ संघाकडून खेळताना बॅक टू बॅक शतके झळकावली आहेत आणि तो एक सलामीवीर आहे. त्यामुळे सिल्हेटमधील भारतीय अ संघाची दुसरी कसोटी संपल्यानंतर तो मुख्य संघासोबत जॉईन होऊ शकेल."
बांग्लादेशविरुद्ध कसोटी संघ?
रोहित शर्मा (कर्णधार)/ अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 14 ते 18 डिसेंबर | झहूर अहमद चौधरी स्टेडियम |
दुसरा कसोटी सामना | 22 ते 26 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
हे देखील वाचा-