Chamika Karunaratne Hospitalized: श्रीलंकेत सुरू असलेल्या देशांतर्गत क्रिकेट लीग खेळली जात आहे. लंका प्रीमिअर लीगमध्ये (Lanka Premier League 2022) बुधवारी गॉल ग्लॅडिएटर्स आणि कॅन्डी फॅलकॉन्स (Galle Gladiators vs Kany Falcons) यांच्यातील सामन्यात चमिका करूणारत्नेला (Chamika Karunaratne) झेल पकडताना मोठी दुखापत झाली. नुवानिंदु फर्नांडोचा झेल पकडताना चमिकाचे चार दात पडले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होतोय. या घटनेनंतर चमिकाला ताबडतोब रुग्णालयात पाठवण्यात आलं.

गाले ग्लॅडिएटर्स विरुद्ध कँडी फाल्कन्स बुधवारी (8 डिसेंबर) एकमेकांसमोर आले. दरम्यान,कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर ग्लॅडिएटर्सचा फलंदाज नुवानीडू फर्नांडोनं मोठा फटका मारला.चेंडू हवेत खूपच उंच गेलेला चेंडू चमिका करुणारत्ने झेल घेण्यासाठी चेंडूच्या खाली आला. दरम्यान, चेंडू त्याच्या तोंडावर आदळला. पण तरीही त्यानं झेल पकडला. परंतु जेव्हा तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला, तेव्हा त्याच्या तोंडातून रक्त निघत असल्याचं पाहायला मिळालं.त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आले. महत्वाचं म्हणजे, झेल पकडताना त्याचे चार दात पडल्याची माहिती समोर आलीय. 

व्हिडिओ-

 

कँडी फाल्कन्स ग्लॅडिएटर्सवर विजय
या सामन्यात नाणेफेक जिंकून ग्लॅडिएटर्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विन सुबासिंघा (40 धावा) आणि इमाद वसीम (34) यांच्या दमदार खेळींच्या  जोरावर ग्लॅडिएटर्सनं निर्धारित 20 षटकात कँडी फाल्कनसमोर  121 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात कँडी फाल्कन्सनं पाच षटक शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. 

चमिका करूणारत्नेची आंतरराष्ट्रीय कारकिर्द:

क्रिकेट सामने डाव धावा विकेट्स सरासरी इकोनॉमी स्ट्राईक रेट
कसोटी 1 2 148 1 148.00 5.69 156.0
एकदिवसीय 18 16 460 16 28.75 5.54 31.1
टी-20 38 35 802 21 38.19 8.03 28.5

हे देखील वाचा-