(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC Odi Ranking | विराट अव्वल स्थानी कायम, रोहित शर्माच्या रँकिंगमध्ये घसरण
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ताज्या क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचे 825 अंक आहेत. न्यूझीलंडचा रॉस टेलर चौथ्या तर ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच पाचव्या क्रमांकावर आहे.
ICC Ranking | पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांची क्रमवारी (ICC Ranking) जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली 857 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा बाबर आझम ताज्या क्रमवारीत दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. तो कोहलीच्या पाच गुण मागे आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 852 गुणांसह ताज्या क्रमवारीत दुसर्या स्थानावर आला आहे.
बर्याच दिवसांपासून दुसर्या क्रमांकावर असलेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ताज्या क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचे 825 अंक आहेत. न्यूझीलंडचा रॉस टेलर चौथ्या तर ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच पाचव्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फखर जमानने 193 धावांची खेळी केली. या खेळीमुळे आयसीसीच्या नव्या क्रमवारीत त्याला सात स्थानांचा फायदा झाला आहे. आता तो 12 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या रासी वॅन डर ड्यूसेननेही पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या आणि दुसर्या एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 123 आणि 60 धावांचे खेळी केली. त्यामुळे तो या क्रमवारीत 22 व्या स्थानावर पोहोचला आहे.
ICC टॉप पाच फलंदाज
- रोहित शर्मा- भारत
- बाबर आझम- पाकिस्तान
- रोहित शर्मा- भारत
- रॉस टेलर- न्यूझीलंड
- अॅरॉन फिन्च- ऑस्ट्रेलिया
गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नॉर्ट्जे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये सात विकेट घेतल्या. यासह तो आयसीसी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत 73 व्या स्थानी पोहोचला. त्याचबरोबर टी -20 फॉरमॅटमध्ये बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडकडून पदार्पण करणारा फिन अॅलनने तिसऱ्या सामन्यात 29 चेंडूंत 71 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर तो पहिल्या 100 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात 15 धावा देऊन तीन बळी घेत सहाव्या स्थानावर आला आहे.
ICC टॉप पाच गोलंदाज
- ट्रेन्ट बोल्ट - न्यूझीलंड
- मुजीब उर रहमान- बांगलादेश
- मॅट हेन्री- न्यूझीलंड
- जसप्रीत बुमराह- भारत
- कसिगो रबाडा- दक्षिण आफ्रिका