ICC Mens Test Rankings : कसोटी क्रिकेटमध्ये भारत 'जगात भारी'! ऑस्ट्रेलियाला मागे टाकत टेस्टमध्ये अव्वल
ICC Mens Test Rankings : भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकून कसोटी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. मागील 15 महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर होती.
![ICC Mens Test Rankings : कसोटी क्रिकेटमध्ये भारत 'जगात भारी'! ऑस्ट्रेलियाला मागे टाकत टेस्टमध्ये अव्वल ICC Mens Test Rankings India Become Number 1 Test Team Going Past Australia Ahead World Test Championship 2023 Final ICC Mens Test Rankings : कसोटी क्रिकेटमध्ये भारत 'जगात भारी'! ऑस्ट्रेलियाला मागे टाकत टेस्टमध्ये अव्वल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/7e879d5dd93e353880007e0f481fa8391683015716592344_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India Become Number 1 in ICC Mens Test Rankings : कसोटी क्रिकेटमध्ये भारत (India) 'जगात भारी'... ऑस्ट्रेलियाला (Australia) मागे टाकत भारतीय क्रिकेट संघ (Team India) टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल ठरला आहे. पुरुषांच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आता भारतीय क्रिकेट संघ आहे. मागील 15 महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाकडे असलेलं कसोटी क्रिकेटचं पहिलं स्थान आता भारतीय संघाच्या नावे झालं आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलपूर्वी (ICC World Test Championship Final) भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे.
ICC Mens Test Rankings : कसोटी क्रिकेटमध्ये भारत अव्वल
आयसीसी क्रिकेट क्रमवारीत आता भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना हा अलीकडच्या इतिहासातील सर्वात रोमांचक प्रतिस्पर्ध्यांपैकी एक बनला आहे. दरम्यान, इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून भारतीय विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC) अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने 24 एप्रिल रोजी टीम इंडियाची घोषणाही केली आहे.
📍 The Oval
— ICC (@ICC) March 15, 2023
🗓 7 June, 2023
🇦🇺 🆚 🇮🇳
The stage is set for an epic #WTC23 finale 🤩 pic.twitter.com/8Z1s7iE7lB
आयसीसीनं वार्षिक रँकिंग जाहीर केली आहे. यानुसार, भारत सध्या 121 गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल आहे, तर ऑस्ट्रेलिया 116 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आधीच्या रँकीगनुसार, ऑस्ट्रेलिया 122 गुणांसह पहिल्या क्रमांकावर होता आणि भारत तीन गुणांनी (119 गुण) पिछाडीवर होता. वार्षिक क्रमवारीत मे 2020 पासून पूर्ण झालेल्या सर्व मालिकांचा विचार केला जातो, मे 2022 पूर्वी पूर्ण झालेल्या मालिका 50 टक्के आणि त्यानंतरच्या सर्व मालिकांचा विचार केला जातो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढत
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (World Test Championship 2023) फायनलसाठी ऑस्ट्रेलियानं संघांची घोषणा केली. ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया संघ टीम इंडियाविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम मुकाबला होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळांडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियानं खेळाडूंची यादी (Australia Squad) जाहिर केला आहे. भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅट रेनशॉ, मार्कस हॅरिस आणि मिचेल मार्श यांचा समावेश करण्यात आला आहे.
WTC Team India : भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
WTC Team Australia : ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)