ICC Mens Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात आयसीसीने नुकतीच नवीन कसोटी रँकिग (ICC Test Ranking) जाहीर केली. यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करुन टॉप 10 मध्ये स्थान मिळवणाऱ्या गोलंदाजांची (Test Bowlers) यादीही समोर आली आहे. या यादीमध्ये काही बदल झाले असून भारताच्या बुमबुम जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मोठी उडी घेत टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने (Pat Cummines) पहिलं स्थान मिळवलं असून दुसऱ्या स्थानी भारताचा रवीचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) विराजमान आहे. तर नवव्या स्थानावर बुमराहने जागा मिळवली आहे. तर नेमकी यादी कशी आहे यावर एक नजर फिरवूया...
ICC Test Ranking :
- पॅट कमिन्स (902गुण)
- आर आश्विन (873 गुण)
- शाहीन आफ्रिदी (822 गुण)
- टी साऊदी (814 गुण)
- जेम्स अँडरसन (813 गुण)
- कागिसो रबाडा (810 गुण)
- जोश हेझलवुड (802 गुण)
- नील वॅगनर (794 गुण)
- जसप्रीत बुमराह (781 गुण)
- मिशेल स्टार्च (778 गुण)
हे ही वाचा -
- Shardul Thakur : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात 7 विकेट घेत शार्दूलने रचला इतिहास, अनेक रेकॉर्ड केले नावावर
- Ranji Trophy Rescheduled: कोरोनाचा फटका रणजी चषकाला, स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करणार, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती
- रहाणे-पुजाराप्रमाणे कोहलीही खराब फॉर्ममध्ये तरी त्याच्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत : आशिष नेहरा
- IND vs SA : भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रीकेनेही जाहीर केला एकदिवसीय संघ, टेम्बा बावुमाकडे कर्णधारपद
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live