ICC Mens Test Ranking : आयसीसीने टी20 रँकिगसोबतच (ICC T20 Ranking) कसोटी रँकिगही (ICC Test Ranking) जाहीर केली. यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या फलंदाजांची यादीही समोर आली आहे. या यादीमध्ये काही बदल झाले असून इंग्लंडचा कर्णधार जो रुटचं (Joe Root) पहिलं स्थान ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाने पटकावलं आहे. हा फलंदाज म्हणजे सध्या सुरु असेलेल्या अॅशेस मालिकेत (The Ashes) उत्कृष्ट कामगिरी करणारा मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne). मार्नस 912 गुणांसह पहिल्या स्थान पटकावलं आहे. तर जो रुट 897 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर नेमकी यादी कशी आहे यावर एक नजर फिरवूया...


ICC Test Ranking : 



  1. मार्नस लाबुशेन (912गुण) 

  2. जो रुट (897 गुण)

  3. स्टीव्ह स्मिथ (884 गुण)

  4. केन विल्यमसन (879 गुण)

  5. रोहित शर्मा (797गुण)

  6. डेव्हिड वॉर्नर (775 गुण)

  7. विराट कोहली (756 गुण)

  8. डी. करुनारत्ने (754 गुण)

  9. बाबर आजम (750 गुण)

  10. ट्रेव्हीस हेड (728 गुण)


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha