मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सालचे वेळापत्रक जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तानच्या महामुकाबल्याची तारीख समोर आली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान 23 फेब्रुवारीला एकमेकांना भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही 19 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून 9 मार्च रोजी त्याचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद हे  पाकिस्तानकडे आहे. पण भारत आणि पाकिस्तानचे सामने, तसेच भारताचे सर्व सामने हे हे यूएईमधील दुबई शहरात आयोजित करण्यात येणार आहेत.  


चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताचे सामने आयोजित करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबई शहराची तटस्थ ठिकाण म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. अंतिम सामना 9 मार्च रोजी लाहोरमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. जर टीम इंडिया बाद फेरीसाठी पात्र ठरली तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामनेही दुबईतच होतील.


ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक


19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची


20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई


21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची


22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर


23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई


24 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी


25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी


26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर


27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी


28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर


1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची


2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई


4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई*


5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर**


9 मार्च - फायनल - गद्दाफी स्टेडियम, लाहोर**


सर्व सामने पाकिस्तानी वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होतील..


उपांत्यपूर्व 1 मध्ये भारत पात्र ठरला तर सामील होईल


पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी 2 मध्ये सामील होईल


जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला जाईल.