एक्स्प्लोर

ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार 19 दिवस रंगणार, सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तान 'या' दिवशी भिडणार

ICC Champions Trophy Ind Vs Pak Date : या स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. मात्र भारत आणि पाकिस्तानचे सामने हे दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. 

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सालचे वेळापत्रक जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तानच्या महामुकाबल्याची तारीख समोर आली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान 23 फेब्रुवारीला एकमेकांना भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही 19 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून 9 मार्च रोजी त्याचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद हे  पाकिस्तानकडे आहे. पण भारत आणि पाकिस्तानचे सामने, तसेच भारताचे सर्व सामने हे हे यूएईमधील दुबई शहरात आयोजित करण्यात येणार आहेत.  

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताचे सामने आयोजित करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबई शहराची तटस्थ ठिकाण म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. अंतिम सामना 9 मार्च रोजी लाहोरमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. जर टीम इंडिया बाद फेरीसाठी पात्र ठरली तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामनेही दुबईतच होतील.

ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक

19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची

20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची

22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

24 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी

28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची

2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई*

5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर**

9 मार्च - फायनल - गद्दाफी स्टेडियम, लाहोर**

सर्व सामने पाकिस्तानी वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होतील..

उपांत्यपूर्व 1 मध्ये भारत पात्र ठरला तर सामील होईल

पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी 2 मध्ये सामील होईल

जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला जाईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Christmas Holiday : कोकण ते नाशिक, तुळजापूर ते कोल्हापूर; नाताळची सुट्टी, पर्यटनं गजबजलीSuresh Dhas on Beed Massajog Crime : 'मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकत्व घ्यावं'Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; आदिती तटकरे म्हणतात...Devendra Fadnavis :वाल्मिक कराडचा प्रश्नावर,फडणवीस म्हणाले..कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
आजपासून टप्प्याटप्याने पात्र महिलांना मिळणार लाडक्या बहिणींचा रखडलेला हफ्ता, अदिती तटकरे म्हणाल्या..
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
Embed widget