BCCI समोर पाकिस्तान नतमस्तक, ICC कडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलला मंजूरी, IND VS PAK सामना कुठे होणार?
ICC approved hybrid Champions Trophy 2025 : यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजित केले जाणार आहे.
ICC Champions Trophy 2025 : यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजित केले जाणार आहे. बीसीसीआयने आयसीसीला आधीच सांगितले होते की ते या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवणार नाहीत. आयसीसीने पाकिस्तानला या प्रकरणाची माहिती दिली. तेव्हापासून आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात या विषयावर सतत चर्चा सुरू आहे. अनेक बैठकीनंतर आयसीसी बीसीसीआय आणि पीसीबीने एका मुद्द्यावर एकमत केले आहे.
🚨 ICC HAS APPROVED THE HYBRID MODEL FOR CHAMPIONS TROPHY 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) December 13, 2024
- Dubai will host India games in the Champions Trophy 2025. [Sports Tak]
Colombo will host the India vs Pakistan group game in the 2026 T20I World Cup. pic.twitter.com/kF27RHz8sg
या देशात होणार भारत-पाकिस्तान सामना
आयसीसीचे उच्च अधिकारी शनिवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठकीत 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलवर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत भारत किंवा पाकिस्तान हे दोघेही एकमेकांच्या देशात आयसीसी स्पर्धा खेळणार नाहीत, असा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याऐवजी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे भारताचे सामने दुबईमध्ये खेळले जातील. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
पाकिस्तान पण येणार नाही भारतात
आता आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकमेकांच्या देशात खेळणार नाही, असे पीसीबीने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ असा की जेव्हा भारत 2025 च्या महिला एकदिवसीय वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणार आहे, तेव्हा पाकिस्तान भारतात जाणार नाही आणि तो सामना इतर ठिकाणी खेळेल. याव्यतिरिक्त, 2026 च्या पुरुष टी-20 वर्ल्ड कप जो भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित केले जातील, पाकिस्तानला देखील भारतात जावे लागणार नाही आणि मोठ्या सामन्यासाठी ते श्रीलंकेला जातील.
आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, शनिवारी एक आभासी बैठक होणार असून, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह ब्रिस्बेनहून सामील होणार आहेत. यानंतर आयसीसीकडून अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. सध्या, हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्यासाठी पीसीबीला कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2008 च्या आशिया कपनंतर भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही, तर पाकिस्तानने गेल्या वर्षी एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी भारताला भेट दिली होती.
हे ही वाचा -