ICC Equal Prize Money: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे आयसीसी स्पर्धेत पुरुष आणि महिला संघांना बक्षीसाची रक्कम समान मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकामधील डर्बनमध्ये आज आयसीसीती वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत 2030 पर्यंत आयसीसीच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष संघांना बक्षीसाची रक्कम समान देण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या निर्णायाचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्वागत केलेय. पुरुष आणि महिला संघातील भेदभाव आता संपला आहे. आयसीसीच्या स्पर्धेत यापुढे महिला आणि पुरुष संघांना एकसारखेच बक्षीस मिळणार आहे. दोन्ही संघ एकसारखेच प्रगती करतील. हा निर्णय घेतल्यामुळे आयसीसीच्या सदस्याचे आभार, असे जय शाह म्हणालेत.
आयसीसीच्या स्पर्धामध्ये यापूर्वी महिलांनी मिळणारे बक्षीस पुरषांच्या तुलनेत खूप कमी होते. आता 2030 पर्यंत महिला आणि पुरुषांना समान बक्षीसांची रक्कम देण्यात येणार आहे. वनडे, टी 20 आणि इतर आयसीसीच्या स्पर्धामध्ये दोन्ही संघांना समान रक्कम मिळणार आहे. आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्कले यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही एतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे आयसीसीच्या स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुष संघांना समान रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. 2017 पासून आम्ही महिलांना मिळणाऱ्या पुरस्काराच्या रक्कमेत वाढ केली.