Shubman Gill Viral Video : डोमिनिका कसोटीच्या पहिल्या दिवसावर भरताने वर्चस्व मिळवले. अश्विन आणि जाडेजाच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजचा संघ 150 धावांवर आटोपला. अश्विनने पाच तर जाडेजाने तीन विकेट घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी बिनबाद 80 धावांची भागिदारी केली. पहिल्या दिवसात शुभमन गिल याने फिल्डिंग करताना केलेला डान्स सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 


शुभमन गिल शॉटलेग वर फिल्डिंग करत होता. त्यावेळी तो डान्स करत असल्याचे दिसले.. शुभमन गिल याचा डान्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्या डान्सचे कौतुक होतेय. व्हायरल होणारा व्हिडीओ 64 व्या षटकातील आहे. वेस्ट इंडिजची अखेरची जोडी फलंदाजी करत होती.  रकीम कार्नवाल आणि जोमेन वरिक्कन फलंदाजी करत असताना थोड्यावेळासाठी सामना थांबला होता. त्यावेळात गिल डान्स करताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


पाहा व्हिडीओ....






कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या इशान किशनच्या फिल्डिंगच्या व्हिडीओचीही जोरदार चर्चा सुरु आहे. यष्टीमागे इशान किशन याने जबराट झेल घेतला. त्याशिवाय मोहम्मद सिराज यानेही हवेत उंचावत झेल घेतला. या व्हिडीओचेही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.  










अश्विनच्या फिरकीत अडकले वेस्ट इंडिजचे खेळाडू 


डोमिनिका टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी बँटिंग करण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेला वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि जाडेजा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अगदी तुटून पडले. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 47 धावा एलिकनं केल्या. त्यानं 99 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एक षटकार लगावला. इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट अवघ्या 20 धावा करुन माघारी परतला. तेजनारायण चंद्रपॉल 12 धावांवर आऊट झाला, तर कॉर्नवाल 19 धावांवर नाबाद राहिला. 


टीम इंडियासाठी अश्विननं 24.3 ओव्हर्समध्ये 60 धावा देत तब्बल 5 विकेट्स घेतले. त्यानं 6 मेडन ओव्हरही काढले. अश्विनसाठी हा डाव अत्यंत खास होता. त्याचं कारण म्हणजे, टीम इंडियाच्या स्टार स्पिनरनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवलं, त्यासोबतच त्यानं 700 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केले. रवींद्र जाडेजानं 14 ओव्हर्समध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानं 7 मेडन ओव्हर्स काढले. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजनंही प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.