1983 World Cup: भारताचा (Team India) माजी कर्णधार कपिल देवच्या (Kapil Dev) नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक जिंकलाय. 1983 च्या विश्वचषकात भारतानं चमकदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य संघ वेस्ट इंडीजचा (West Indies) दबदबा संपवला होता. भारताला विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव पहिला कर्णधार ठरला.
1983 विश्वचषकात कपिल देवचं उत्कृष्ट प्रदर्शन
कपिल देवच्या वाढदिवसानिमित्त आयसीसीनं एक व्हिडिओ बनवला होता. ज्यात 1983 च्या विश्वचषकात कपिल देवनं कसं प्रदर्शन केलंय, हे दाखवण्यात आलं होतं. 1983 मधील विश्वचषकात कपिल देवनं केलेल्या कामगिरीवर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतुकाचा वर्षाव केला जातो. कपिल देव यांच्यानंतर भारताला विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंह धोनी दुसरा कर्णधार ठरला.
भारतानं वेस्ट इंडिजचं वर्चस्व संपवलं
क्रिकेटविश्वात वेस्ट इंडीजनंतर भारत दुसरा मजबूत संघ म्हणून समोर आला. विश्वचषकात फक्त वेस्ट इंडीजच्या संघानेच पहिल्या दोन ट्रॉफी जिंकून क्रिडाविश्वात आपलं वर्चस्व बनवलं. परंतु, 1983 मध्ये भारतानं विश्वचषक जिंकून वेस्ट इंडीजचं तिसऱ्या विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मोडलं.
भारतात क्रिकेट कसं लोकप्रिय झालं?
1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला खूप सन्मान मिळाला. त्यावेळी बीसीसीआयकडं जास्त पैसे नव्हते. तेव्हा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला दोन लाख रूपये देण्याचं ठरलं. दरम्यान, भारताची कोकिळा दिवंगत लता मंगेशकर यांनी भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येकी एक-एक लाख रूपये दिले. त्यानंतर भारतात क्रिकेटचं वेड लागलंय. सध्या भारताकडं उत्कृष्ट खेळाडू तर आहेच, पण बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत बोर्डापैकी एक आहे.
हे देखील वाचा-