Daryl Mitchell Record : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात पार पडणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) येथे सुरु आहे. या सामन्यांत न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर संघानं दमदार कामगिरी केली असून यामध्ये चांगली फलंदाजी केलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने (Daryl Mitchell) एक नवा रेकॉर्ड नावे केला आहे. कसोटी सामन्यांत सलग तीन शतकं लगावण्याचा विक्रम करत अशी कामगिरी करणारा डॅरिल पहिला वहिला न्यूझीलंडचा खेळाडू ठरला आहे. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 400 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिला न्यूझीलंडचा फलंदाज ठरलाय.
डॅरिल याने सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येक सामन्या शतक ठोकलं आहे. यावेळी पहिल्या सामन्याती दुसऱ्या डावात त्याने 108 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातील पहिलाय डावात तब्बल 190 धावांची तुफान खेळी केली. दुसऱ्या डावातही त्याने 62 धावा केल्याच. यानंतर आता अखेरच्या तिसऱ्या सामन्यातील पहिल्याच डावात त्याने 109 धावा करत सलग तीन सामन्यात शतक झळकावत एक नवा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिलाच न्यूझीलंडचा खेळाडू आहे.
डॅरिल तुफान फॉर्मात
डॅरिलनं या दौऱ्यात तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने सात डावात एक शतक आणि चार अर्धशतक ठोकले. लीड्स कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं 329 धावा केल्या होत्या. ज्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने खराब कामगिरी सुरु ठेवली आहे. पण अखेरच्या डावात डॅरिल किती कामगिरी केल हे पाहावे आहे.
हे देखील वाचा-