एक्स्प्लोर

पंतप्रधानांसाठी फुटपाथ मोकळे करता, मग मुंबईकरांसाठी का नाही? अतिक्रमणावरून हायकोर्टाचे ताशेरे

स्वच्छ आणि मोकळे फुटपाथ हा नागरीकांचा मुलभूत अधिकार देण्यात प्रशासनाच्या ईच्छाशक्तीचा अभाव - हायकोर्ट

HIGH COURT OF BOMBAY : मुंबईतील रस्ते व फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टानं सोमवारी पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला चांगलंच फटकारलं. मुंबईत पंतप्रधान अथवा कुणी व्हीव्हीआयपी येणार असेल तेव्हा फुटपाथवरील फेरीवाल्यांना तातडीनं हटवता, मात्र इतर दिवशी कोणतीच कारवाई का केली जात नाही?, या शब्दांत न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. इतकच नव्हे तर स्वच्छ आणि मोकळ्या फूटपाथवरून चालणं हा नागरीकांचा मूलभूत अधिकार असून तो देण्याकरता पालिका व राज्य सरकार बांधील असल्याची आठवण करून दिली.

फूटपाथ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. मुलांना आपण फूटपाथवर चालायला सांगतो, पण चालण्यासाठी फूटपाथच उरला नाही, तर मुलांना काय सांगायचं?, असा सवाल हायकोर्टानम केला. फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी 'काम सुरु आहे' हेच उत्तर वारंवार ऐकायला मिळतं पण प्रत्यक्षात कुठलीही ठोस कृती दिसत नाही. यातून सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. इच्छा असेल, तर मार्ग नेहमीच सापडतो असे खडे बोल यावेळी हायकोर्टानं सुनावले.

काय आहे प्रकरण -

मुंबईतील फूटपाथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले असून हायकोर्टानं याप्रकरणी सुओमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एम. एस. सोनक व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. फेरीवाल्यांच्या मुद्यावर बोलताना व्हीव्हीआयपींसाठी एक दिवस रस्ते आणि फुटपाथ फेरीवलामुक्त करू शकता, मग नागरिकांना सतत होणारा त्रास लक्षात घेत फेरीवाल्यांवर दररोज कारवाई का करत नाही? असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केला. फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी काय उपाय करता येतील?, याचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता सरकारला काहीतरी ठोस उपाययोजना करावी लागेल. येथील नागरिक कर भरतात त्यामुळे त्यांना स्वच्छ आणि मोकळे फुटपाथ मिळायलाच हवेत, असंही खंडपीठानं स्पष्ट केलं.

यावर पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील एस. यू. कामदार यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितलं की, रस्ते, फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र लगेच गायब होणारे फेरीवाले अधिकारी गेले की पुन्हा त्याच जागेवर परत येतात. या अनुषंगानं पालिका आता भूमिगत मार्केट्सचा विचार करीत आहे, यावर महापालिका या समस्येला जमिनीखाली गाडण्याचा प्रयत्न करतेय की काय? अशी मिश्किल टिप्पणी करत हायकोर्टानं सुनावणी 22 जुलैपर्यंत तहकूब केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL Trade News : हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
Hardik Pandya Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये संघात मोठं बंड? रोहित शर्मानंतर हार्दिकचाही गेम ओव्हर... मॅनेजमेंट तडकाफडकी घेणार निर्णय
मुंबई इंडियन्समध्ये संघात मोठं बंड? रोहित शर्मानंतर हार्दिकचाही गेम ओव्हर... मॅनेजमेंट तडकाफडकी घेणार निर्णय
Vaibhav Sooryavanshi : IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची थेट पाकिस्तानच्या आफ्रिदीशी तुलना; दिग्गज क्रिकेटपटूने नेमकं काय काय म्हणाला?
IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची थेट पाकिस्तानच्या आफ्रिदीशी तुलना; दिग्गज क्रिकेटपटूने नेमकं काय काय म्हणाला?
Sakib Hussain : इशान किशनबाबत शाकिब हुसेनचा मोठा खुलासा; म्हणाला, संघर्षाच्या काळात आईने माझ्यासाठी दागिने विकले, पण इशान भैय्याने....
इशान किशनबाबत शाकिब हुसेनचा मोठा खुलासा; म्हणाला, संघर्षाच्या काळात आईने माझ्यासाठी दागिने विकले, पण इशान भैय्याने....

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
IPL Trade News : हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
Satara Sangli MLC : मविआत सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
Vasai Cyber Fraud : धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
Shrikant Shinde Beed Visit: बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
Eknath Khadse: 'महार वतन' जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर; विरोधकांवर हल्लाबोल करत नाथाभाऊ म्हणाले...
'महार वतन' जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर; विरोधकांवर हल्लाबोल करत नाथाभाऊ म्हणाले...
Karan Johar: करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
Embed widget