एक्स्प्लोर

Hasin Jahan on Mohammed Shami : 'हा' वडील बाईबाजीच्या नादात मुलीच्या आयुष्याशी खेळायचा, दुसऱ्यांच्या बायकांच्या मुलींना जगभर फिरवायचा; मोहम्मद शमीच्या पत्नीकडून पुन्हा आरोपांचा यॉर्कर

Hasin Jahan on Mohammed Shami : इंस्टाग्रामवर हसीन जहाँ हिने मुलगी आयरा जहाँचा शाळेच्या युनिफॉर्ममधील फोटो शेअर केला. ज्यामध्ये मोहम्मद शमीवर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले.

Hasin Jahan Cryptic Instagram Post : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी यांच्याकडून दरमहा चार लाख रुपयांची निर्वाहभत्ता मिळाल्यानंतर, हसीन जहां हिने आपल्या मुलीचा प्रवेश एका नामांकित इंटरनॅशनल शाळेत करून दिला आहे. सोशल मीडियावर मुलीचा फोटो शेअर करताना हसीन जहाँ हिने एक मोठी पोस्ट लिहिली आणि पुन्हा एकदा शमीवर निशाणा साधला. अलीकडेच कोलकाता हायकोर्टाने मोहम्मद शमीला हसीन जहाँ आणि त्यांच्या मुलीच्या भरणपोषणासाठी दरमहा 4 लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर हसीन जहाँ सोशल मीडियावर वारंवार क्रिप्टिक पोस्ट टाकत आहेत.

शमीवर पुन्हा हसीन जहाँने निशाणा साधला (Hasin Jahan Instagram update)

इंस्टाग्रामवर हसीन जहाँ हिने मुलगी आयरा जहाँचा शाळेच्या युनिफॉर्ममधील फोटो शेअर केला. या पोस्टला कॅप्शन देताना तिने लिहिले की, "अल्लाहमुळे आज मी खूप आनंदी आहे. माझ्या शत्रूंनी माझ्या मुलीला शाळेत प्रवेश मिळू नये असा प्रयत्न केला, पण अल्लाहने त्यांचे तोंड काळे केले आणि माझ्या मुलीला एका इंटरनॅशनल शाळेत प्रवेश मिळाला."

इतकंच नाही, तर शमीवर थेट निशाणा साधत हसीन जहाँ पुढे लिहिले की, मुलीचे वडील खूप प्रयत्न करत होते की, माझी मुलगी चांगल्या शाळेत शिकू नये. पण वडील हे देव नसतात. जिचे वडील कोट्यधीश आहेत, तो वडील फक्त स्त्रीबाजीच्या नादात आपल्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करत होता, आणि इतर स्त्रियांच्या मुलांना मात्र मोठ्या शाळांत शिकवत होता. मुलींना बिझनेस क्लास फ्लाइटने फिरवत होता, पण आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते. अल्लाहचे आभार की देशात कायदा आहे, नाहीतर आमचं काय झालं असतं माहीत नाही."

हसीन जहाँचा हा पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटिझन्सही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. एक यूजरने लिहिलं, "शमी आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो, आपण काय बोलत आहात?"

मुलीच्या वाढदिवशी शमीचा भावनिक पोस्ट (Mohammed Shami social media post)

याआधी 17 जुलै रोजी शमीने मुलगी आयराच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्ट शेअर करून तिच्या अनेक फोटोंसह तिच्या चांगल्या आरोग्यासाठी, प्रगतीसाठी आणि आनंदासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 2018 पासून मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ वेगळे राहत आहेत. हसीन यांनी शमीवर घरगुती हिंसा, मॅच फिक्सिंग आणि इतर गंभीर आरोप केले होते. आयरा आपल्या आईसोबत कोलकात्यात राहते. दोघांमध्ये बराच काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती आणि शेवटी कोलकाता हायकोर्टाने शमीला हसीन जहाँ आणि त्यांच्या मुलीला दरमहा 4 लाख रुपये देण्याचा आदेश दिला.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mukul Choudhary News : सचिन तेंडुलकरच्या मुलाने वॉर्निंग दिली होती, पण सगळ्यांनी हलक्यात घेतलं, त्याच मुकेशने दिल्लीचा पालापोचाळा करत संघाला जिंकवून दिलं
सचिन तेंडुलकरच्या मुलाने वॉर्निंग दिली होती, पण सगळ्यांनी हलक्यात घेतलं, त्याच मुकेशने दिल्लीचा पालापोचाळा करत संघाला जिंकवून दिलं
C D Gopinath News : ब्रिटीशांना पहिल्यांदा धूळ चारणाऱ्या त्या ऐतिहासिक प्लेइंग-11चा 'द लास्ट मॅन स्टँडिंग' अनंतात विलीन; सी.डी. गोपीनाथ यांचे 96 व्या वर्षी निधन
ब्रिटीशांना पहिल्यांदा धूळ चारणाऱ्या त्या ऐतिहासिक प्लेइंग-11चा 'द लास्ट मॅन स्टँडिंग' अनंतात विलीन; सी.डी. गोपीनाथ यांचे 96 व्या वर्षी निधन
7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
Babar Azam: विराट कोहली प्रमाणं मॅच कधी फिनिश करणार? पत्रकाराचा थेट प्रश्न, बाबर आझम भडकला, व्हिडिओ व्हायरल
विराट कोहली प्रमाणं मॅच कधी फिनिश करणार? पत्रकाराचा थेट प्रश्न, बाबर आझम भडकला आणि म्हणाला...

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Embed widget