England vs India 2nd Test : जेव्हा बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली, तेव्हा हर्षित राणाला त्यात स्थान देण्यात आले नव्हते. पण टीम इंडिया पहिल्या कसोटीसाठी लीड्सला पोहोचली, तेव्हा हर्षित राणा देखील संघासोबत दिसला होता. परंतु आता बातमी अशी आहे की केकेआरचा हा स्टार खेळाडू भारतात परत पाठवण्यात आला आहे.
भारत-इंग्लंड मालिकेतील दुसरा कसोटी सामना (IND vs ENG 2nd Test) 2 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळला जाणार आहे. हर्षित राणाला भारतात परत पाठवल्याच्या वृत्ताला स्वतः भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दुजोरा दिला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार गौतम गंभीर म्हणाला की, "मी अद्याप मुख्य निवडकर्त्याशी बोललो नाही. संघात काही फिटनेसशी संबंधित समस्या असल्याने मी मुख्य निवडकर्त्याशी बोलेन. म्हणूनच आम्ही हर्षितला बॅकअप खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केले. सध्या सर्व काही ठीक दिसत आहे, त्यामुळे त्याला भारतात परतावे लागेल."
लीड्स कसोटीत भारतीय फलंदाजांनी एकूण 5 शतके झळकावली होती, तरीही इंग्लंडने चौथ्या डावात 371 धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यात यश मिळवले. 148 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारत हा पहिला देश बनला आहे, ज्याने 5 शतके झळकावूनही कसोटी सामना गमावला. या सामन्यात भारताकडून ऋषभ पंतने दोन्ही डावात शतक झळकावले, त्याच्याशिवाय शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले.
या कसोटी सामन्यात एकूण 1,673 धावा झाल्या, जे भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा आहेत. हर्षित राणाच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर आतापर्यंत त्याने 2 सामन्यांमध्ये फक्त चार विकेट घेतल्या आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-
20-24 जून 2025 - हेडिंग्ले, लीड्स, पहिली कसोटी - भारताचा पराभव
दुसरी कसोटी- 2-6 जुलै, 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी- 10-14 जुलै, 2025 - लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी- 23-27 जुलै, 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी- 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन
भारताचा इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघ (2025)
कर्णधार : शुभमन गिल
उपकर्णधार आणि विकेटकीपर : ऋषभ पंत
फलंदाज : यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी
ऑलराउंडर : रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
विकेटकीपर : ध्रुव जुरेल
हे ही वाचा -