India Playing XI for IND vs ENG 2nd Test : लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला. इंग्लंडने चौथ्या डावात 82 षटकांत 5 गडी गमावून 371 धावांचे लक्ष्य गाठले. या सामन्यात भारताने 5 शतके केली आणि दोन्ही डावात 835 धावा झाल्या, तरीही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतानेही बरेच झेल सोडले. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण सुरू आहे, ज्यामध्ये शार्दुल ठाकूरला सर्वाधिक दोषी ठरवण्यात आले आहे.

शार्दुल ठाकूर 2 वर्षांनी भारतीय कसोटी संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून परतला आणि इंग्लंडविरुद्ध त्याच्यावर विश्वास दाखवत संघ व्यवस्थापनाने त्याला अंतिम इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली. परंतु त्याच्या खराब कामगिरीने सर्वांना निराश केले. आता टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि सलामीवीर सुनील गावसकर यांनी एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला अंतिम इलेव्हनमधून वगळण्याची मागणी केली आहे.

शार्दुल ठाकूरचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता होणार कट?

अलीकडेच, रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर शार्दुल ठाकूरने कसोटी संघात स्थान मिळवले, तो काहीतरी चांगले करेल असे मानले जात होते. परंतु असे झाले नाही आणि तो चेंडू आणि फलंदाजी दोन्हीत अपयशी ठरला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 6 षटकांत 38 धावा देऊन एकही विकेट घेतली नाही. त्यानंतर, त्याने दुसऱ्या डावात दोन विकेट घेतल्या, ज्यामध्ये बेन डकेट आणि हॅरी ब्रूक दोघेही महत्त्वाच्या क्षणी बाद झाले होते, परंतु नंतर तो ही कामगिरी पुढे चालू ठेवू शकला नाही.

कुलदीप यादवला संघात मिळणार स्थान?

शार्दुल ठाकूरच्या फलंदाजीतील योगदानाकडे पाहता हा निर्णय काहीसा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. त्याच्या फलंदाजीमुळे संघाला विशेष फायदा झालेला नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने एक विशेषज्ञ गोलंदाज संघात घ्यावा का, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी असे सुचवले की डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला बर्मिंगहॅमच्या खेळपट्टीवर मदत मिळू शकते. त्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी द्यावी, असं सुचवलं आहे.

बर्मिंगहॅममध्ये कुलदीपला मिळणार मदत... 

गावसकर यांनी सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, जसप्रीत बुमराह तंदुरुस्त आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटते की कुलदीप यादव संघात आला पाहिजे. त्याने शार्दुल ठाकूरच्या जागी संघात यावे. कारण बर्मिंगहॅमची खेळपट्टी अशी असेल, जिथे मनगट फिरकी गोलंदाजाला काही मदत मिळेल. तसेच ते असेही बोलले की, साई सुदर्शन आणि करुण नायर दोघांवरही बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदरसारख्या खेळाडूचा समावेश केल्याने गोलंदाजी आक्रमणात काही फरक येऊ शकतो, जो अगदी सामान्य दिसत आहे.

हे ही वाचा -

Yashasvi Jaiswal : 105 धावा केल्या, पण 165 धावा दिल्या, 4 कॅच सोडले; यशस्वी जैस्वालच सर्वात मोठा विलन ठरला!