India Playing 11 2nd Test: इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडनं भारतावर 5 विकेटनं विजय मिळवला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून सुरु होणार आहे. दुसरी कसोटी बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये होणार आहे. या मॅचमध्ये टीम इंडियात काही बदल पाहायला मिळू शकतात. आपण संभाव्य बदलांबाबत जाणून घेणार आहोत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान बर्मिंघममध्ये होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. तर, टॉस दुपारी तीन वाजता होईल. ही मॅच सोनी स्पोर्टस नेटवर्कवर पाहता येईल.तर,डिजीटल प्रक्षेपण जिओ हॉटस्टारवरुन केलं जाईल. पाच सामन्यांच्या इंग्लंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताला दुसरी कसोटी जिंकून कोणत्याही परिस्थिती तक कमबॅक करणं गरजेचं आहे.
'या' खेळाडूंना संघाबाहेर जावं लागणार?
आयपीएल 2025 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात तो शुन्यावर बाद झाला. तर दुसऱ्या डावात 30 धावा करुन बाद झाला. करुण नायर देखील पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला तर दुसऱ्या डावात 20 धावा करुन बाद झाला. या दोघांना संघाबाहेर जावं लागेल. शार्दुल ठाकूरला पुन्हा संधी मिळणार का याबाबत देखील प्रश्नचिन्ह आहे.
कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी?
खेळपट्टी आणि वातावरण पाहता इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ दोन फिरकीपटूंना स्थान देण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजासोबत कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यापैकी एकाला संधी मिळू शकते. सुंदरची फलंदाजी हा प्लस पॉईंट ठरु शकतो तर कुलदीप यादव चायनामन स्पिनर आहे.
दुसर्या कसोटीसाठी संभाव्य टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर किंवा नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर किंवा वॉशिंगटन सुंदर किंवा कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज