INDW vs SAW बंगळुरु : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND W vs SA W) यांच्या महिला संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. भारतानं पहिल्या दोन मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे. स्मृती मानधना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं 325 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनं (South Korea) कडवी लढत दिली मात्र  त्यांना विजय मिळवता आला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ 50 ओव्हरमध्ये 321 धावांपर्यत पोहोचला. त्यामुळं भारताला अटीतटीच्या लढतीत विजय मिळाला. हरमनप्रीत कौरनं टीम इंडियाचा विजयाचा जल्लोष सुरु असताना लौरा वुल्वार्ट हिनं केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. हरमनप्रीतनं य माध्यमातून नेतृत्त्व कसं करावं हे दाखवून दिलं.  हरमनप्रीतनं या कृतीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

  


भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दुसरा विजय मिळवत मालिका जिंकली आहे. स्मृती मानधना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी भारताकडून शतकं केली. स्मृती मानधनानं 120 बॉलमध्ये 136 धावा केल्या. कॅप्टन हरमनप्रीतनं 88  बॉलमध्ये 103 धावा करत कारकिर्दीतील सहावं शेतक केलं. 


पाहा व्हिडीओ :






विजयसाठी 326 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खराब झाली.  लौरा वुल्वार्ट आणि मारिजेन कॅप या दोघींनी 184 धावांची भागिदारी करत टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होतं. दोघींनी 184 धावांची भागिदारी केली.  दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 54 धावांची भागिदारी आवश्यक होती. तीन ओव्हरमध्ये त्यांनी 31 धावा काढल्या. 49 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 12 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये त्यांना 11 धावा हव्या होत्या. अखेरची ओव्हर पूजा वस्त्राकर हिची होती. पहिल्या दोन बॉलमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 5 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या दोन बॉलमध्ये पूजानं दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लौरा वुल्वार्ट हिनं पहिल्या बॉलवर एक रन काढली. यानंतर तिला स्ट्राईक शेवटच्या बॉलवर मिळाली. अखेरच्या बॉलवर दक्षिण आफ्रिकेला 5 धावा हव्या होत्या. कॅप्टन लौरा वुल्वार्ट एकही रन करु शकली नाही. त्यामुळ दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागला.  


दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लौरा वुल्वार्ट 50 ओव्हर मैदानावर तळ ठोकून होती. अखेरच्या ओव्हरमध्ये संघाला विजय मिळवून न देता आल्यानं लौरा वुल्वार्ट निराशपणे मैदानाबाहेर निघाली होती. दुसरीकडे भारतीय संघ जल्लोष करत होता. हरमनप्रीत कौरनं टीम इंडियाच्या खेळाडूंचं अभिनंदन करत असताना वेळ काढत निराश झालेल्या लौरा वुल्वार्ट हिचं शतकाबद्दल अभिनंदन केलं. हरमनप्रीत कौरनं दाखवलेल्या दिलदारपणाचा व्हिडीओ बीसीसीआयकडून शेअर करण्यात आला आहे.  


संबंधित बातम्या :


Rahul Dravid : अफगाणिस्तानला हलक्यात घेऊ नका, त्यांची टीम टी 20 मध्ये सर्वात धोकादायक, द्रविड गुरुजींचा रोहितच्या शिलेदारांना इशारा


Virat Kohli : न्यूयॉर्कमध्ये स्थिती वेगळी होती,सुपर 8 मध्ये तुम्हाला खरा विराट कोहली पाहायला मिळेल : इरफान पठाण