बारबाडोस : टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) सुपर 8 च्या (Super 8) लढती सुरु झाल्या आहेत. आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) आमने सामने येणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री 8 वाजता ही मॅच सुरु होईल. सुपर 8 मध्ये भारतीय चाहत्यांचं लक्ष विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्याकडे लागलं आहे. विराट कोहलीला ग्रुप स्टेजमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन रोहित शर्मानं नवा प्रयोग केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करत आहेत. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण यानं विराट कोहलीला पाठिंबा देणारं वक्तव्य केलं आहे. तुम्हाला सुपर 8 मध्ये खरा विराट कोहली पाहायला मिळेल, असं इरफान पठाण यानं म्हटलं आहे.
इरफान पठाण म्हणाला की विराट कोहलीला मोठ्या मॅचेसमध्ये कशी कामगिरी करायचं हे माहिती आहे. विराट कोहली याच गोष्टीमुळं स्पेशल ठरतो, असं इरफान पठाण यानं सांगितलं.
इरफान पुढं म्हणाला की, टीम इंडियासाठी कोहली त्याची कामगिरी करुन दाखवेल. विशेषत: जेव्हा मोठ्या मॅचेस असतात त्यावेळी विराट कोहलीनं कामगिरी करुन दाखवली आहे. तुम्ही फक्त वाट पाहा विराट कोहली आजच्या मॅचमध्ये स्लॉग स्वीप मारताना पाहायला मिळेल, असं इरफान पठाण यानं म्हटलं. न्यूयॉर्कमधील स्थिती आव्हानात्मक होती. आता परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला खरा विराट कोहली पाहायला मिळेल, असं इरफान पठाण यानं म्हटलं.
विराट कोहलीनं यापूर्वी भारतासाठी महत्त्वाच्या मॅचेसमध्ये दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून डावाची सुरुवात करताना विराटनं सर्वाधिक धावा केल्या होत्या. विराट कोहलीनं आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकली होती.
राशिद खान विरुद्ध आक्रमक फलंदाजी करावी लागणार : अंबाती रायडू
टीम इंडियाचा माजी खेळाडू अंबाती रायडू यानं राशिद खान विरुद्ध चांगली फलंदाजी करावी लागेल. तुमच्यापुढं राशिध खानचं आव्हान असेल. राशिद खानच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करण्याची गरज असल्याचं देखील रायडूनं म्हटलं. फलंदाज म्हणून तुम्हाला राशिद खानच्या कमजोर बॉलची वाट पाहावी लागेल. तो दुखापतीनंतर उपचार घेऊन पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागल्यानंतर पहिल्यासारखी जादुई कामगिरी करु शकले नाहीत, असं अंबाती रायडू म्हणाला.
भारताची संभाव्य टीम: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज
संबंधित बातम्या:
T20 World Cup 2024 : शिवम दुबे सुपर-8 मध्ये टीम इंडियासाठी ठरणार एक्स फॅक्टर, जाणून घ्या कारण