हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!
रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याकडून हार्दिक पांड्याला नियमित गोलंदाजी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. टीम इंडियाला वेगवान अष्टपैलूची गरज आहे, हार्दिक पांड्यानं गोलंदाजी न केल्यास त्याचं संघातील स्थान धोक्यात येऊ शकतं, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
BCCI Meeting : हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर बीसीसीआय खूश नसल्याचं समोर आले आहे. हार्दिक पांड्याला टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान द्यायचं की नाही? यासाठी रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांच्यामध्ये मुंबईत दोन तास चर्चा झाली. हार्दिक पांड्यानं दुखापतीनंत क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले, पण त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या टी 20 विश्वचषकातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याकडून हार्दिक पांड्याला नियमित गोलंदाजी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. टीम इंडियाला वेगवान अष्टपैलूची गरज आहे, हार्दिक पांड्यानं गोलंदाजी न केल्यास त्याचं संघातील स्थान धोक्यात येऊ शकतं, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये आत्तापर्यंत लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये तो फ्लॉप ठरतोय. गोलंदाजी करताना त्यानं 11 च्या सरासरीने धावा खर्च केल्या आहेत. त्याशिवाय प्रत्येक सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही. त्यामुळे हार्दिक पांड्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच गेल्या आठवड्यात बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यलयामध्ये बीसीसीआयची महत्वाची बैठक पार पडली. आगामी टी 20 विश्वचषकाच्या अनुषंगानं ही बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीला निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये टी 20 विश्वचषकासाठीच्या संघातील खेळाडूबाबत सखोल चर्चा झाली. यामध्ये हार्दिक पांड्या याच्या कामगिरीवरही चर्चा झाली.
रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा, अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांच्यामध्ये गेल्या आवड्यात बैठक पार पडली. यामध्ये हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर आणि टी 20 विश्वचषकातील समावेशावर सखोल चर्चा झाली. आयपीएलनंतर जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 विश्वचषकाचा रनसंग्राम होणार आहे. त्यासाठी लवकरच टीम इंडियाची निवड होणार आहे. आयपीएलमधील हार्दिकच्या कामगिरीमुळे त्याच्या विश्वचषक संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून त्यावरच या बैठकीच चर्चा झाल्याचं समोर आले आहे.
हार्दिकला गोलंदाजी करण्याचा सल्ला -
हार्दिक पांड्यानं दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले. पण तो नियमित गोलंदाजी करताना दिसत नाही. त्याला नियमित गोलंदाजी करण्याचा सल्ला बीसीसीआयकडून देण्यात आला आहे. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानं सहा सामन्यापैकी फक्त तीन सामन्यात गोलंदाजी केली. त्यानं एकाही सामन्यात संपूर्ण चार षटकं गोलंदाजी केली नाही. त्याला फक्त तीन विकेट घेता आल्या. त्याशिवाय धावाही त्यानं खूप खर्च केल्या आहे. फलंदाजीतही त्याला सूर गवसलेला नाही. टी 20 विश्वचषकाच्या दृष्टीनं भारतीय संघ व्यवस्थापनासाठी ही चिंतेची बाब आहे. हार्दिक पांड्यासाठी बॅक ऑफ द लेंग्थ, सीम आणि कटर्स ही प्रमुख अस्त्रं राहिली आहेत. पण यंदाच्या आयपीएलमध्ये यातलं एकही अस्त्र त्याच्या कामी आलेलं नाही. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला नियमित गोलंदाजी कऱण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फॉर्मात असणारा हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी हवाय, असा सल्ला बीसीसीआयकडून पांड्याला देण्यात आलाय.