Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
Natasa Stankovic Video : भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातबाबत सोशल मीडियावर तर्क वितर्क सुरु आहेत.
Natasa Stankovic Video : भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातबाबत सोशल मीडियावर तर्क वितर्क सुरु आहेत. माध्यमातील रिपोर्टसनुसार हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी अधिकृतपणे भाष्य केलं नाही. पण सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चा सुरु असतानाचा नताशाचा एक व्हिडीओ व्हायरल होतेय. त्यामध्ये ती एका व्यक्तीला किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडियावर नताशा हार्दिक पांड्याला धोका देत असल्याची चर्चा सुरु आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर नताशा हार्दिक पांड्याला धोका देत होती का? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटच्या चर्चा सुरु आहेत. पण दोन्ही बाजूने यावर अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आताच त्यांचं नातं संपलं, असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण नताशा हिचा किस करताना व्हिडीओ चकीत करणारा आहे. व्हिडीओमध्ये नताशा स्टॅनकोविक एका व्यक्तीला किस करताना दिसत आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. व्हिडीओत नताशा स्टॅनकोविक घराच्या बाल्कनीत उभी असल्याचं दिसत आहे. तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला ती किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी मे 2020 मध्ये लग्न केलं होतं. ते दोघे मुंबईत एका पार्टीत भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं. आता नताशा स्टॅनकोविकनं तिच्या आडनावातून पांड्या हटवल्यानं घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, हार्दिक पांड्यानं याबाबत अधिकृत वक्तव्य केलं नाही.
हार्दिक पांड्याची 70 टक्के प्रॉपर्टी जाणार ?
हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच आणखी एका चर्चेला उधाण आलेय. घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याला आपल्या संपत्तीमधील 70 टक्के वाटा नताशाला द्यावा लागेल, या चर्चेला वेग आलाय. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.