Bengaluru Blasters beat Shivamogga Strikers, KPL 2022: भारताच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट संघाबाहेर (Team India) असलेल्या सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये (Karnataka Premier League) दमदार प्रदर्शन करत आहे. या स्पर्धेत बेंगळुरू ब्लास्टर्सचे (Bengaluru Blasters) कर्णधार असलेल्या मयांकनं शिवमोग्गा स्ट्रायकर्सविरुद्ध (Shivamogga Strikers) वादळी शतक झळकावून संघाला नऊ विकेट्स राखून शानदार विजय  मिळवून दिला. या सामन्यात मयांकनं 208 च्या स्ट्राईक रेटनं 49 चेंडूत 102 धावांची नाबाद खेळी केलीय. ज्यात 10 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. 


केपीएलमध्ये शतक झळकावणारा दुसरा फलंदाज
शिवमोग्गा स्ट्रायकर्सविरुद्ध दमदार कामगिरी करत केपीएलमध्ये शतक करणारा झळकावणारा मयांक अग्रवाल दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी गुलबर्ग मिस्टिक्सच्या रोहन पाटीलने गुरुवारी म्हैसूर वॉरियर्सविरुद्ध स्पर्धेतील पहिलं शतक झळकावलं होतं. या स्पर्धेत मयंकनं आतापर्यंत चार डावात 241 धावा केल्या आहेत.


ट्वीट-



भरत आणि कदमचंही अर्धशतकं
शिवमोग्गा स्ट्रायकर्सनं पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात केली. सलामीवीर रोहन कदम आणि केएस भरत यांनी पहिल्या विकेटसाठी 14.2 षटकात 116 धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतकं पूर्ण केली. भरतनं 45 चेंडूत 51 धावांच्या खेळीत 5 चौकार मारलं. तर, रोहननं 162 च्या स्ट्राईक रेटने 52 चेंडूत 84 धावा केल्या आणि 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले.


आयपीएलमध्ये मयांक अग्रवालची निराशाजनक कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पंजाब किंग्जनं मयांक अग्रवालकडं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. मयांकनं 13 सामन्यात 16 च्या सरासरीनं 196 धावा केल्या. अर्धशतक झळकावलं होतं. स्ट्राइक रेट 123 होता. आयपीएल 2021 मध्ये मयांकनं 12 सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीनं 441 धावा केल्या. त्यानं 4 अर्धशतकं केली होती. स्ट्राइक रेट 140 होता.


हे देखील वाचा-