(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Glenn Phillips: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात ग्लेन फिलिप्स बनला सुपरमॅन; हवेत उडी मारून पकडला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला (New Zealand vs Australia) पराभवाची धुळ चारली.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला (New Zealand vs Australia) पराभवाची धुळ चारली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) खेळण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं 89 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं ऑस्ट्रेलियासमोर 201 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्त्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाला अवघ्या 111 धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉन्वेनं 58 चेंडूत नाबाद 92 धावांची खेळी केली. या सामन्यात न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्सच्या (Glenn Phillips) उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. या सामन्यात त्यानं पकडलेल्या अफलातून झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील नवव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉयनिसनं हवेत फटका मारला. हा चेंडू खूप उंच गेला. चेंडू ग्लेनपासून खूप दूर होता. पण त्यानं सुपरमॅनसारखी हवेत उडी घेऊन हा झेल पकडला. ग्लेनच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ग्लेनचा हा झेल चाहत्यांना खूप आवडला आहे. ग्लेनचा हा झेल पाहून चाहते त्याला सुपरमॅन म्हणत आहेत.
व्हिडिओ-
Superhuman Phillips!
— ICC (@ICC) October 22, 2022
We can reveal that this catch from Glenn Phillips is one of the moments that could be featured in your @0xFanCraze Crictos of the Game packs from Australia v New Zealand.
Grab your pack from https://t.co/8TpUHbQQaa to own iconic moments from every game. pic.twitter.com/VCDkdqmW3m
ट्वीट-
New Zealand win their first men's international game on Australian soil since 2011 🔥#T20WorldCup | #AUSvNZ | 📝 Scorecard: https://t.co/ouB6f5vSvG pic.twitter.com/gcCoihn9UD
— ICC (@ICC) October 22, 2022
ऑस्ट्रेलियाची खराब गोलंदाजी
टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया सामने सामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर अशरक्ष: गुडघे टेकले. पॅट कमिन्स सर्वात महाग ठरला. त्यानं चार षटकात 46 धावा दिल्या. तर, अॅडम झम्पानं चार षटकात एक विकेट्स घेऊन 39 धावा खर्च केल्या. याशिवाय, मार्कस स्टॉइनिसने चार षटकांत 38 धावा आणि मिचेल स्टार्कनं चार षटकांत 36 धावा दिल्या. याचबरोबर जोश हेझलवूडनंही चार षटकांत 41 धावा दिल्या. मात्र, त्याला दोन विकेट घेण्यात यश आलं.
हे देखील वाचा-