नवी दिल्ली: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या मेगा ऑक्शनच्या निमित्तानं वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत. क्रिकेटमधील नामांकित खेळाडू मेगा ऑक्शननंतर वेगवेगळ्या संघांमध्ये पाहायला मिळू शकतात. आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन डिसेंबर आणि फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. त्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडू दुसऱ्या संघात जाण्याची शक्यता आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये (Royal Challengers Bengaluru) देखील बदल होण्याची शक्यता आहे. स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये बिनसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं आगामी आयपीएल 2025 च्या हंगामात ग्लेन मॅक्सवेल आरसीबीकडून खेळताना पाहायला मिळणार का प्रश्न आहे.
ग्लेन मॅक्सवेलनं काय केल?
मेगा ऑक्शनपूर्वी स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं मेगा ऑक्शनपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलनं आरसीबीला अनफॉलो केल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आगामी आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी हे पाऊल उचललं गेलं असल्यानं ग्लेन मॅक्सवेल आरसीबीकडून खेळणार की दुसऱ्या संघाकडून खेळणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. आरसीबीच्या संघातून ग्लेन मॅक्सवेलला संघाबाहेर जावं लागण्याची शक्यता अंदाज देखील वर्तवला जात आहे.
2021 पासून ग्लेन मॅक्सवेल आरसीबीसोबत
आयपीएल 2021 च्या लिलावावेळी 14.25 कोटी रुपये रक्कम मोजून आरसीबीनं ग्लेन मॅक्सवेला संघात घेतलं होतं. आयपीएलच्या 2023 च्या हंगामात मॅक्सवेलनं 14 मॅचमध्ये 400 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या 17 व्या हंगामात ग्लेन मॅक्सवेल अपयशी ठरला. 10 मॅचमध्ये तो केवळ 52 धावा करु शकला होता.
ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 134 सामने खेळले आहेत. मॅक्सवेलनं 156.73 च्या स्ट्राइक रेटनं 2771 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 18 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 134 सामन्यांमध्ये मॅक्सवेलनं 8.28 च्या इकोनॉमीनं 37 विकेट घेतल्या आहेत.
आरसीबी विजेतेपदापासून दूर
रॉयल चॅलेंजर्स बगंळुरुला आयपीएलच्या 17 व्या हंगामापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असून देखील आरसीबीची विजेतेपदाची पाटी कोरी राहिली आहे. आयपीएलच्या 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सुरुवातीच्या पराभवानंतर दमदार कामगिरी केली होती. दमदार कामगिरी करत आरसीबीनं उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली होती. मात्र, त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आगामी आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरु शकते. त्यासाठी काही नव्या खेळाडूंना देखील संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
मुलाचा वाढदिवस अन् हार्दिक पांड्या भावूक; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, तू मला दररोज...