IPL Auction 2025: केकेआर मेगा ऑक्शनपूर्वी मोठा डाव टाकणार, चार खेळाडूंना रिटेन करणार, भारतीय अन् विदेशी खेळाडूंवर विश्वास ठेवणार
आयपीएल 2024 चं विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत मिळवलं होतं. 2025 च्या आयपीएल साठी मेगा ऑक्शन होणार आहे. केकेआरनं सांघिक कामगिरीच्या जोरावर विजेतेपद मिळवलं होतं. भारतीय आणि विदेशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. मिशेल स्टार्क, फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर,सुनील नरेन हे केकेआरचे प्रमुख खेळाडू आहेत. केकेआर कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकाता नाईट रायडर्स कर्णधार श्रेयस अय्यरला रिटेन करण्याची दाट शक्यता आह. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात केकेआरनं विजेतेपद मिळवलं. श्रेयसनं 115 मॅचमध्ये 3 हजार धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात केकेआरनं 10 वर्षानंतर विजेतेपद मिळवलं आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये श्रेयसनं 14 मॅचमध्ये 351 धावा केल्या होत्या.
हर्षित राणा हा केकेआरचा वेगवान गोलंदाज असून त्यानं 2024 च्या हंगामात 19 विकेट घेतल्या होत्या. सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या स्थानावर होता. हर्षित राणाला केकेआरकडून रिटेन केलं जाण्याची शक्यता दाट आहे.
सुनील नरेन गेल्या 12 वर्षांपासून केकेआरकडून खेळतोय. केकेआरनं फलंदाजीत देखील दमदार केली आहे. नरेननं 176 सामन्यांमध्ये 1534 धावा केल्या असून 180 विकेट देखील घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज आंद्रे रसेल देखील कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आहे. आंद्रे रसेल हा फलंदाजी आणि गोलंदाजी देखील करु शकतो. त्यामुळं केकेआर त्याला रिटेन करण्याची शक्यता आहे.