IND vs SL 3rd T20I Team India Playing XI: भारत आणि श्रीलंका  (Ind vs SL) यांच्यात आज (30 जुलै, मंगळवार) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाईल. यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळेच तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक-दोन नव्हे तर चार बदल पाहायला मिळू शकतात. मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तिसऱ्या टी-20 साठी बदल करण्याच्या तयारीत आहे. 


संजू सॅमसनला आज पुन्हा संधी मिळणार-


श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल पाहायला मिळू शकतात. संघात पहिला बदल संजू सॅमसनच्या रूपाने पाहायला मिळतो. दुसऱ्या टी-20 मध्ये शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. आता तिसऱ्या टी-20 मध्ये शुभमन गिलचे पुनरागमन होऊ शकते. दुसऱ्या टी-20 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणाऱ्या संजूला संधीचा फायदा घेता आला नाही आणि तो शून्यावर बाद झाला होता. याशिवाय दुसरा बदल वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या रूपात होऊ शकतो. मोहम्मद सिराजच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमचा तिसऱ्या टी-20च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये सिराजला केवळ एकच विकेट घेता आली आहे.


दोन अष्टपैलूंना मिळणार विश्रांती-


अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या हे पहिल्या दोन टी-20 मध्ये अष्टपैलू म्हणून खेळताना दिसले. अशा परिस्थितीत दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना तिसऱ्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. हार्दिक पांड्याच्या जागी शिवम दुबेला संधी मिळू शकते आणि अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.


श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


संजू सॅमसन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, खलील अहमद.


शेवटच्या सामन्याच्या निकालाने काहीही फरक पडणार नाही-


आता या मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या निकालाने काही फरक पडणार नाही, तेव्हा 'राखीव बेंच'मधील काही खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न सूर्यकुमारला विचारण्यात आला. तर यावर'आम्ही बसून निर्णय घेऊ. आमच्या खेळाडूंनी कठीण परिस्थितीत खूप चांगली कामगिरी केली, असं सूर्यकुमार यादवने दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर सांगितले होते. 


वनडे मालिकेचे वेळापत्रक-


2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)


4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)


7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)


संबंधित बातमी:


'मला कर्णधार व्हायचं नाही...'; श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव काय बोलून गेला?