Ind vs SL: भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यात आज (30 जुलै, मंगळवार) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाईल. यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात संघात बदल करण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या, अक्षर पटेलला विश्रांती देऊन शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


टी-20 मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. या वनडे मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल, श्रेयस अय्यर, हर्षित राणा, कुलदीप यादव श्रीलंकेत दाखल झाले आहेत. तसेच या सहाही खेळाडूंनी कोलंबोत सराव सुरु केला आहे. मालिकेतील तिन्ही वनडे सामने कोलंबो मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सध्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पल्लेकेले येथे असून आज तिसरा टी-20 सामना याच मैदानावर रंगणार आहे. 






संजू सॅमसनला आज पुन्हा संधी मिळणार-


श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल पाहायला मिळू शकतात. संघात पहिला बदल संजू सॅमसनच्या रूपाने पाहायला मिळतो. दुसऱ्या टी-20 मध्ये शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. आता तिसऱ्या टी-20 मध्ये शुभमन गिलचे पुनरागमन होऊ शकते. दुसऱ्या टी-20 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणाऱ्या संजूला संधीचा फायदा घेता आला नाही आणि तो शून्यावर बाद झाला होता. याशिवाय दुसरा बदल वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या रूपात होऊ शकतो. मोहम्मद सिराजच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमचा तिसऱ्या टी-20च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये सिराजला केवळ एकच विकेट घेता आली आहे.


वनडे मालिकेचे वेळापत्रक-


2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)


4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)


7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)


संबंधित बातमी:


'मला कर्णधार व्हायचं नाही...'; श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव काय बोलून गेला?


IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-20 सामना; टीम इंडिया चार बदलांसह मैदानात उतरणार?, पाहा संभाव्य Playing XI