Glenn Maxwell ODI Retirement : ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का, एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
Glenn Maxwell ODI retirement News : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेटविश्वाला आणि आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

Glenn Maxwell announces ODI retirement : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेटविश्वाला आणि आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. मॅक्सवेलने त्याच्या 13 वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीला निरोप दिला आहे. मॅक्सवेलने आज (2 जून 2025) ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली, 2012 मध्ये पदार्पणापासून त्याने त्याच्या 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास 4,000 धावा केल्या आहेत.
After a truly memorable ODI career, Glenn Maxwell has called time on that format: https://t.co/ktWUdnmoVM pic.twitter.com/hn5zCZdE5V
— cricket.com.au (@cricketcomau) June 2, 2025
36 वर्षीय मॅक्सवेलने त्याच्या 13 वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी केल्या आणि ऑस्ट्रेलियाला दोनदा (2015 आणि 2023) एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी 149 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 33.81 च्या सरासरीने 3990 धावा केल्या. या दरम्यान, त्याने 4 शतके आणि 23 अर्धशतके ठोकली. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तानविरुद्ध 201 धावांची नाबाद खेळी, जी एकदिवसीय इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते. या खेळीत, मॅक्सवेलने 91/7 च्या धावसंख्येतून सावरत ऑस्ट्रेलियाला विजयाकडे नेले, जे एक चमत्कारिक कामगिरी होती. मॅक्सवेलने गोलंदाजीतही योगदान दिले आणि कारकिर्दीत 72 बळी घेतले.
🚨 GLENN MAXWELL ANNOUNCED HIS RETIREMENT FROM ODIS. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 2, 2025
- Thank you, Maxi. ❤️ pic.twitter.com/Gqz32dXO4Y
मॅक्सवेलने त्याच्या निवृत्तीबद्दल काय म्हटले?
ग्लेन मॅक्सवेलने एका पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, "चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या काही सामन्यांनंतर मी कदाचित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असेल. मला वाटले की मी स्वतःला त्या सामन्यांसाठी तंदुरुस्त आणि तयार होण्याची चांगली संधी दिली. लाहोरमध्ये खेळलेला पहिला सामना आम्ही कठीण आउटफिल्डवर खेळलो आणि त्या सामन्यापासून मी खूप अस्वस्थ होतो."
ग्लेन मॅक्सवेलने या पॉडकास्टमध्ये 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या त्याच्या डावाची आठवण केली. तो म्हणाला, "अफगाणिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात आउटफिल्ड ओले होते, जिथे आम्ही 50 षटके क्षेत्ररक्षण केले होते आणि शेवटच्या सामन्यानंतर मी योग्यरित्या तयार नव्हतो. मला जाणवू लागले की जर एकदिवसीय क्रिकेटमध्ये परिस्थिती माझ्यासाठी योग्य नसेल, तर कदाचित माझे शरीर त्याचा सामना करण्यास संघर्ष करेल. तिथे राहणे कठीण काम होते. मला वाटले की मी माझ्या संघाला निराश करत आहे, कारण माझे शरीर परिस्थितीवर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत होते, त्याबद्दल मी देखील खूश नव्हतो."
मॅक्सवेलला वाटते की, 2027 चा वर्ल्ड कप लक्षात ठेवून त्यांना त्यांच्या जागी दुसरा पर्याय शोधावा लागेल आणि त्यावर काम करावे लागेल. त्याने याबद्दल अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्याशी बोलला. तो म्हणाला, "आम्ही 2027 च्या वर्ल्ड कपबद्दल बोललो. मी त्यांना सांगितले की मला वाटत नाही की मी 2027 चा वर्ल्ड कप खेळू शकेन. मला वाटते की आता माझ्या जागी इतर पर्याय शोधण्याची वेळ आली आहे."





















