Gujrat Titans : गुजरात टायटन्सकडे हार्दिक, राशिद आणि शुभमनसह आणखी एक हुकूमी एक्का, भारताला जिंकवून दिला होता विश्वचषक
Gujrat Titans team : यंदा आयपीएलमध्ये नव्याने सामिल झालेल्या गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपद हार्दीक पंड्याकडे असून राशिद खान, शुभमन, शमी हे स्टार खेळाडूही संघात आहेत.
Gujrat Titans Team : आगामी आयपीएल 2022 26 मार्चपासून सुरु होत आहे. यंदा गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स हे दोन संघ नव्याने सामिल झाल्याने स्पर्धा आणखी चुरशीची होणार यात शंका नाही. यात गुजरात संघाचा विचार करता त्यांची फलंदाजी सुमार दिसत असली तरी मधली फळी आणि गोलंदाजी दमदार आहे. त्यात त्यांच्या ताफ्यात आणखी एक हुकूमाचा एक्का आहे. तो म्हणजे मेन्टॉर गॅरी क्रिस्टन (Gary Kirsten).
संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे असून राशिद, शमी आणि शुभमन हे स्टार खेळाडू संघात असताना सर्वांवर लक्ष्य ठेवून त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी मेन्टॉरच्या भूमिकेत गॅरी आहे. गॅरी हे भारताला 2011 साली विश्वचषक जिंकवून देणारा दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू असून गुजरातच्या रणनीतीत ते महत्त्वाची भूमिका नक्कीच बजावतील. त्यात संघाचा मुख्य कोच म्हणून आशिष नेहरा असून आशिषही 2011 विश्वचषकातील संघात महत्त्वाचा खेळाडू होता.
गुजरातची ताकद आणि कमजोरी
गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांच्याकडे असणारा बोलिगं अटॅक त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. कारण संघात जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान आहे. सोबत वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी सारखे दिग्गज आहेत. नवखा पण उत्तम असा अल्झारी जोसेफही गुजरातमध्ये असून अनुभवी जयंत यादव आणि आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा राहुल तेवतिया संघात आहे. गोलंदाजीनंतर फलंदाजीचा विचार करता संघात मधली फळी मजबूत आहे. कारण संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या जर चांगल्या फॉर्ममध्ये असेल तर त्याच्यासारखा अव्वल फिनीशर तोच. हार्दीकला सोबत देण्यासाठी अनुभवी रिद्धीमान साहा आहे. यासह युवा भारतीय विजय शंकर, राहुल तेवतिया यांचाही संघाला मधल्या फळीत फायदा होऊ शकतो. संघात सलामीवीरांचा प्रश्न काहीसा कठीण आहे. कारण नुकताच जेसन रॉय याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे एकट्या शुभमनवर सलामीची जबाबदारी आहे. जेसनच्या जागी रहमानुल्लाह गुरबाज संघात सामिल झाला आहे. पण त्याला आयपीएलचा खास अनुभव नसल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. आयपीएलमधील बहुतांश संघामध्ये भारतीय क्रिकेटमधील किमान दोन यष्टीरक्षक आहेत. पण गुजरातकडे केवळ रिद्धिमान साहा हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक असल्याने त्याला दुखापत झाल्यास पर्याय नाहीये. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड हा संघात आहे पण त्याचा फिटनेस आणि फॉर्म यावरच त्याची संघातील जागा फिक्स होईल.
असा आहे गुजरातचा संघ -
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी), वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये
हे ही वाचा-
- IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11
- गुजरातच्या संघासाठी खूशखबर! हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट केली पास
- TATA IPL 2022: तब्बल 8 संघाकडून खेळला 'हा' खेळाडू, मेगा ऑक्शनमध्ये ठरला अनसोल्ड; अखेर कोलकात्यानं घेतलं विकत, चेन्नईविरुद्ध रचणार इतिहास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha