T20I Records : टी-20 मध्ये 100 हून अधिक विकेट्स! फक्त 4 जणांना जमलाय हा पराक्रम, यादीत एकही भारतीय नाही
टी 20 चा पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघातील एकाही गोलंदाजाचा यामध्ये समावेश नाही. कोणत्या चार खेळाडूंनी टी 20 क्रिकेटध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्यात पाहूयात...
100+ Wickets in T20I : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटला सुरु होऊन जवळपास 17 वर्षांचा कालावधी उलटलाय. 17 फेब्रुवारी 2005 रोजी आंतरराष्ट्रीय टी 20 (T20I) क्रिकेटला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत फक्त चार गोलंदाजांना 100 पेक्षा जास्त विकेट (100+ Wickets in T20I) घेता आल्यात. टी 20 चा पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघातील एकाही गोलंदाजाचा यामध्ये समावेश नाही. कोणत्या चार खेळाडूंनी टी 20 क्रिकेटध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्यात पाहूयात...
No.1 शाकिब अल हसन :
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन याने सर्वात आधी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेतल्या आहेत. शाकिबने आतापर्यंत टी 20 मध्ये 119 विकेट घेतल्या आहेत. यासाठी शाकिबला 96 सामने खेळावे लागले. यादरम्यान शाकिबच्या गोलंदाजीची सरासरी 19.88 आणि इकॉनॉमी रेट 6.67 इतका राहिलाय.
No.2 टिम साउदी :
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी टी 20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज होय. साउदीने 92 सामन्यात 111 विकेट घेतल्यात. हासिल किए गोलंदाजीची सरासरी 24.58 आणि इकॉनॉमी रेट 8.19 राहिलाय.
No.3 लसिथ मलिंगा :
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मलिंगाने 84 सामन्यात 20.79 च्या सरासरीने 107 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये मलिंगाने 7.42 इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली.
No.4 राशिद खान :
अफगानिस्तानचा फिरकीपटू राशिद खान या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. राशिद खान याने 60 सामन्यात 106 विकेट घेतल्यात. राशिदने 13 च्या सरासरीने गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमी रेट फक्त 6.17 राहिलाय.
भारताकडून सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या?
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. चहलने 55 डावात 68 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 56 सामन्यात 67 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विन आहे. अश्विनने 51 सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार तर पाचव्या क्रमांकावर जाडेजा आहे. भुवनेश्वर कुमारने 59 तर जाडेजाने 48 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 42 विकेट घेतल्यात.