Sunil Gavaskar News : भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गावस्कर यांच्या आईचे निधन झाले असून त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील बाद फेरीच्या सामन्यांवेळी गावस्कर कॉमेन्ट्री करू शकले नव्हते, कारण ते त्यांच्या आजारी आईला भेटायला गेले होते. पण आता भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या कॉमेन्ट्रीसाठी गावस्कर सध्या बांगलादेशमध्ये असताना त्यांच्या आईचे निधन झाले आहे.
निवृत्तीनंतर गावस्कर कायम कॉमेंट्री करताना दिसतात. त्यांनी जगाच्या प्रत्येक देशात कॉमेंट्री केली आहे. गावस्कर यांचा मुलगा रोहन गावस्करची हा देखील क्रिकेटपटू असूनही त्याची कारकीर्द फारशी यशस्वी झाली नाही, पण आता तो देखील कॉमेंट्रीमध्ये सक्रिय दिसत आहे. रोहन अधिकत: देशांतर्गत अर्थात डॉमेस्टीक क्रिकेट सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसतो. दरम्यान गावस्कर हे इतरही खेळांमध्ये इन्टरेस्ट घेताना दिसतात. नुकतेच ते फिफा विश्वचषकाचे सामने पाहायला गेल्याचे देखील दिसून आले होते.
जगातील दिग्गज क्रिकेटर म्हणून गावस्कर प्रसिद्ध
73 वर्षीय गावस्कर यांनी भारतासाठी 125 कसोटीत 51.12 च्या सरासरीने तब्बल 10,122 धावा केल्या आहेत. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारे ते जगातील पहिले फलंदाज आहेत. गावस्कर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 34 शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये चार द्विशतकांचा ही समावेश आहे. याशिवाय त्यांनी 45 अर्धशतकंही केली आहेत. गावस्कर यांनी भारतासाठी 108 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा ते भाग होते. गावस्कर यांनी वनडेमध्ये 35.14 च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी एक शतक आणि 27 अर्धशतकं झळकावली आहेत.
हे देखील वाचा-