R Ashwin Record in IND vs BAN Test : भारताच्या बांगलादेश दौैऱ्यात ढाका येथे दुसरा कसोटी सामना खेळला गेला. यामध्ये भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. सामन्यात अष्टपैलू आर. अश्विनने (R Ashwin) नावाला साजेशी अष्टपैलू खेळी करत सामना जिंकवण्यात मोलाचं योगदान दिलं. त्याने सामन्याच्या दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स तर पहिल्या डावात 12 आणि दुसऱ्या डावात नाबाद 42 धावा केल्या. यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं असून सोबतच त्याने एक दमदार रेकॉर्डही नावावर केला आहे. 


कसोटी सामन्यात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना 9 व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड अश्विनने केला आहे. त्याने बांगलादेशने दिलेल्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 42 धावा करत हा इतिहास रचला. याआधी 1988 मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्सेट बेंजामिन यांनी पाकिस्तानविरुद्ध नाबाद 40 धावांची खेळी केली होती. पण अश्विनने 42 धावा करत हा विक्रम मोडत नवा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे याच कसोटीत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट्ससह 3000 धावाही पूर्ण केल्या आहेत. यासह तो कपिल देव, शेन वॉर्न या दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.


दुसऱ्या कसोटीत अश्विनची कामगिरी


भारताचा स्टार फिरकीपटू अश्विनने याै सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या गोलंदाजीत त्याने पहिल्या डावात घेतलेल्या चार विकेट्ससह या सामन्यात एकूण 6 बळी घेतले. पहिल्या डावात 12 धावा केल्या. तर त्यानंतर दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत दिसत असताना अश्विनने आपला अनुभव आणि समज दाखवत 62 चेंडूत नाबाद 42 धावांची शानदार खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला.


भारताचा बांगलादेशला क्लिन स्वीप


भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकत भारताने क्लिन स्वीप दिला आहे. यावेएळी पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तर दुसरा सामना फारच अटीतटीचा झाला. भारताला शेवटच्या डावात 145 धावांचे माफक लक्ष्य असतानाही 7 गडी गमावून भारत जिंकला आणि तीन विकेट्च्या फरकाने सामना जिंकत भारताने मालिका जिंकली.


हे देखील वाचा-