एक्स्प्लोर

Ian Redpath Passes Away : क्रिकेट विश्व शोकसागरात! 7 दिवसांत 2 खेळाडूंचा मृत्यू, बॉर्डर गावस्कर स्पर्धेत संघावर कोसळला दु:खाचा डोंगर

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे.

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने 295 धावांनी विजय मिळवला. आता मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. पण या सामन्याआधीच एक दु:खद बातमी समोर आली आहे, ज्याने क्रिकेट विश्व शोकसागरात पसरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका दिग्गज क्रिकेटपटूने या जगाचा निरोप घेतला आहे.  

ॲडलेड  पिंक बॉल टेस्ट आधी टीम इंडियाला 30 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळायचा होता. पण पहिल्या दिवशी पाऊस हा सर्वात मोठा खलनायक ठरला आणि सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. आता दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांमध्ये 50-50 षटकांचा सामना खेळवला जात आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात शोककळा पसरली आहे. 

खरंतर, ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज इयान रेडपाथ यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे. जानेवारी 2023 मध्येच त्यांचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आला होता. इयान रेडपाथने 1964 ते 1976 या कालावधीत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 66 कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळले. एक धडाकेबाज सलामीवीर म्हणून त्याची ओळख होती. इयान रेडपाथने 1964 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. आणइ 97 धावा केल्या. त्याच वेळी, त्याने 1971 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला.

इयान रेडपाथने आपल्या कसोटी कारकिर्दीत 4737 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून 8 शतके आली. फेब्रुवारी 1969 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले. तर 1975-76 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध चार डावात तीन शतके झळकावून आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट केला. याशिवाय त्याने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 9.20 च्या सरासरीने केवळ 46 धावा केल्या. 

7 दिवसांत 2 खेळाडूंचा मृत्यू

गेले 7 दिवस ऑस्ट्रेलियासाठी दु:खाने भरलेले आहेत. इयान रेडपाथच्या आधी 23 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अ‍ॅडी डेव्हचाही मृत्यू झाला होता. अ‍ॅडी डेव्हहा अष्टपैलू खेळाडू होता. तो वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. तर 2017 मध्ये, डार्विनमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या संघादरम्यान एक आंतर-संघ सामना खेळला गेला ज्यामध्ये अ‍ॅडी डेव्हला क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली.  

हे ही वाचा -

WTC Points Table 2025 : साऊथ आफ्रिका जिंकली अन् ऑस्ट्रेलिया बसला दणका, WTC च्या पॉइंट टेबलमध्ये सगळं गणित बदललं; टीम इंडियालाही फटका?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
Embed widget