एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांनाही हार्दिक मुकणार? खराब फॉर्म नाही तर दुसरंच आहे कारण

Indian Cricket team मधील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याची कामगिरीही निराशाजनक होत आहे. ज्यामुळे न्यूझीलंडविरुद्धही तो संघात दिसला नाही.

मुंबई: अव्वल दर्जाचे खेळाडू असतानाही यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) भारतीय संघ (Indian Cricket team) सेमीफायनलपर्यंतही पोहचू शकला नाही. त्यामुळे आता संघात अनेक नवे बदल करण्यात येत असून आगामी आयसीसी स्पर्धांपूर्वी भारताला एक मजबूत संघ बनवण्यासाठी बीसीसीआय (BCCI) सज्ज झाला आहे. दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातही संघात काही बदल करण्यात आले. ज्यातील मोठा बदल म्हणजे संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान न्यूझीलंड नंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघाशी भिडणार असून यावेळी तरी हार्दीकला संधी मिळेल का? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

येत्या 17 डिसेंबरपासून आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी हार्दीक या दौऱ्यात खेळणार का? याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. खराब फॉर्ममुळे संघाबाहेर गेलेला हार्दीक आफ्रिकेविरुद्ध संघात परतू शकतो. मात्र यावेळी त्याला गोलंदाजीसाठी संपूर्णपणे फिट होणे गरजेचे आहे. त्यामुळे आता खराब फॉर्मसह फिटनेस हे कारणही पंड्याच्या संघात पुनरागमनातील अडचण होत आहे. 

हार्दीकला फिटनेस टेस्ट अनिवार्य

याबाबत एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जर हार्दिक पंड्याला संघात परतायचे असेल तर त्याला एनसीएची फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. हार्दिकला संघात पुनरागमनासाठी संपूर्णपणे फिट होणे अत्यंत गरजेचे आहे.  पंड्याचे दुखापतीतून सावरणे विश्रांतीवर अवलंबून आहे. त्याने लवकरात लवकर एनसीए गाठावे, त्यानंतर आम्ही त्याच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याबाबत निर्णय घेऊ.” सीसीआयच्या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, हार्दिक पंड्या सध्या कसोटी सामने खेळण्यासाठी तंदुरुस्त (फिट) नाही, कारण या फॉरमॅटमध्ये अधिक फिटनेस आवश्यक हार्दिक पंड्याला सर्व फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी वेळ लागेल. आम्ही घाई करत नाही, कारण लवकरच विश्वचषक स्पर्धा पुन्हा येणार आहे. ज्यात खेळण्याच्या दृष्टीने हार्दीक फिटनेस टेस्ट पास झाला तर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत संधी मिळू शकते. 

अय्यरचा पर्यायही उपलब्ध

पंड्याच्या फिटनेससह आणखी एक अडचण म्हणजे पंड्याला उपलब्ध झालेला वेंकटेश अय्यर हा पर्याय. आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात युएईमध्ये केकेआर संघातून खेळण्यास सुरुवात केलेल्या वेंकटेशने काही सामन्यातच आपला खेळ दाखवत सर्वांची मनं जिकंली. अय्यरने काही अर्धशतकांसह विकेट्सही मिळवल्या. ज्यानंतर आता न्यूझीलंड दौऱ्यात लगेचच अय्यरला संधीही मिळाली. यावेळी अय्यरने पहिल्या दोन सामन्यात फलंदाजीसह तिसऱ्य़ा सामन्यात गोलंदाजीही केली. ज्यावेळी त्याने एक विकेटही मिळवली. ज्यामुळे आता पंड्याच्या पुनरागमनात
अय्यरही एक काटा असल्याचं दिसत आहे.  

संबधित बातम्या-

Ind vs NZ 1st Test: भारतीय संघाला मोठा धक्का, केएल राहुल कसोटी मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडू मिळाली संधी

Syed Mushtaq Ali Trophy : थरारक! अखेरच्या चेंडूवर शाहरुखचा विजयी षटकार, तामिळनाडूला मिळवून दिलं जेतेपद

Indian Premier League 2022: आयपीएल 2022 भारतातच! दहा संघ उतरणार मैदानात; चेन्नईमध्ये रंगणार अंतिम सामना?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Embed widget