India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. आता मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी संघासोबत नसतील. सनरायझर्स हैदराबादचा प्रशिक्षक म्हणून तो आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात सहभागी होणार आहे. आयपीएलचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे.
2022 पासून ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी प्रशिक्षक
डॅनियल व्हिटोरी हा क्रिकेट जगतातील अशा अद्वितीय प्रशिक्षकांपैकी एक आहे, जो फ्रँचायझीचा मुख्य प्रशिक्षक देखील आहे आणि आंतरराष्ट्रीय संघात सहाय्यक भूमिकाही बजावत आहे. 2022 पासून ते अँड्र्यू मॅकडोनाल्डच्या नेतृत्वाखाली तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्याचा अनुभव लक्षात घेऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला फ्रँचायझी क्रिकेटमध्येही प्रशिक्षक करण्याची परवानगी दिली आहे.
आयपीएल लिलावात सहभागी होण्यापूर्वी व्हिटोरी पहिल्या कसोटीसाठी सर्व तयारी पूर्ण करेल. यानंतर तो बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी संघासोबत राहील. आयपीएल लिलावात सहभागी होण्यासाठी तो कसोटीच्या मध्यावर रवाना होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
डॅनियल व्हिटोरी सोमवारी ऑस्ट्रेलियन संघासोबत सरावासाठी वाका मैदानावर होता. त्याने गोलंदाजी युनिटशी जवळून काम केले. दुसरीकडे, रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर चॅनलमध्ये समालोचक म्हणून काम करत आहेत. पण पाँटिंग पंजाब किंग्जचे प्रशिक्षक आहेत आणि लँगर लखनौ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक आहेत. या कारणास्तव, ते लिलावात भाग घेणार आहे.
सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला 23 कोटी, पॅट कमिन्सला 18 कोटी आणि अभिषेक शर्माला 14 कोटी रुपयांना कायम ठेवले आहे. संघाने ट्रॅव्हिस हेडला 14 कोटी आणि नितीश कुमार रेड्डीला 6 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. कमिन्स यंदाही कर्णधारपद भूषवताना दिसू शकतो. 5 खेळाडूंना रिटेन केले म्हणजे त्याच्या खिशात 45 कोटी रुपये उरले आहेत.
हे ही वाचा -