AUS vs PAK 3rd T20I 2024 : पाकिस्तानला तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्कारली आणि अवघ्या 117 धावा करून संपूर्ण संघ कोलमडून पडला. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य केवळ 11.2 षटकांत पूर्ण केले. संघाकडून मार्कस स्टॉइनिसने 27 चेंडूत 61 धावांची स्फोटक खेळी खेळली. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा नवा क्रिकेटर जहांदाद खानसोबत अशी घटना घडली, ज्यामुळे तो मैदानात सगळी हसत होती.
सामन्याच्या मध्येच पँट उतरली
खरं तर झालं असं की, ऑस्ट्रेलियन डावाच्या पहिल्याच षटकात शाहीन शाह आफ्रिदीविरुद्ध फलंदाजाने उत्कृष्ट फटका मारला आणि चेंडू दोन खेळाडूच्या गॅपमध्ये गेला. जहाँदाद खान चेंडूच्या मागे धावला आणि त्याने डाईव्ह मारत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न फेल ठरला आणि यादरम्यान त्याची पॅन्टही उतरली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जहांदाद मैदानावर पडून पँट ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जहांदादचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दोन सामने गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ आपली इज्जत वाचवण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात कर्णधार असलेल्या आघा सलमानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. बाबर आझम उत्कृष्ट अशी सुरुवात करून दिली. बाबरने केवळ 28 चेंडूत 41 धावांची खेळी केली. पण यानंतर पाकिस्तानचा संघ अवघ्या 117 धावा करून ऑलआऊट झाला.
मार्कस स्टॉइनिसची स्फोटक खेळी
118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या 17 धावांवर आपली विकेट गमावली. पण यानंतर स्टॉइनिसच्या झंझावाताने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. स्टॉइनिसने 27 चेंडूत 5 चौकार आणि तब्बल षटकारांच्या मदतीने 61 धावा करत सामन्याचा हिरो ठरला. त्याने शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांसारख्या गोलंदाजांकडून उत्तम क्लास घेतला.
ऑस्ट्रेलियाने T20 मध्ये केला विक्रम
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने मोठा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना 52 चेंडूत 7 विकेटने जिंकला. 2019 ते 2024 या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा टी-20 मध्ये पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. पाकिस्तानविरुद्ध सलग सात टी-20 सामने जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे.
हे ही वाचा -