Asia Cup : आशिया खंडासाठीची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप 2022 (Asia Cup 2022) 27 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. सर्व संघ या भव्य स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. वेळापत्रक तसंच विविध देशांचे संघही जाहीर झाले असून आता विविध खेळाडूंकडून त्यांच्या-त्यांच्या देशांना आशा आहेत. अशामध्ये गोलंदाजीचा विचार करता काही ठरावीक गोलंदाजांवर अनेकांच्या नजरा असणार असून यातील काही नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... 

दुष्मंता चमीरा (श्रीलंका)

दुष्मंता चमीरा याने त्याच्या प्रदर्शनाने सर्वांनाच आतापर्यंत प्रभावित केलं आहे. यासोबतच त्याने आयपीएल 2022 मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेच्या या खेळाडूने आतापर्यंत 50 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. चमीराने 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 30.27 च्या सरासरीने आणि 8.14 च्या इकॉनॉमीने 48 विकेट घेतल्या आहेत.

कसं आहे वेळापत्रक?

यंदा भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

हे देखील वाचा-

हे देखील वाचा-

Asia Cup 2022, Rohit Sharma : आशिया कपमध्ये कसं आहे हिटमॅन रोहित शर्माचं प्रदर्शन? वाचा आकडेवारी 

Asia Cup 2022 : शाहीन आफ्रिदीच्याजागी खेळण्यासाठी दोन नावांची चर्चा, मोहम्मद आमिरनंतर या अनुभवी खेळाडूचंही नाव समोर