Rohit Sharma Record In Asia Cup:आशिया कप 2022 (Asia Cup 2022) सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. भारत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्याने स्पर्धेची सुरुवात करेल. यंदाच्या वर्षी भारताचा फॉर्म पाहता भारत सामना जिंकण्याचा मोठा दावेदार मानला जात आहे. अशामध्ये भारतीय संघाचं नेतृत्त्व हाती असणाऱ्या रोहित शर्माचा (Rohit Sharma) आशिया कपमधील रेकॉर्ड नेमका कसा आहे ते पाहूया...

या स्पर्धेच्या इतिहासात महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्माने आतापर्यंत आशिया कपमध्ये 27 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 42.04 च्या सरासरीने आणि 90 च्या स्ट्राईक रेटने  883 रन बनवले आहेत. यादरम्यान नाबाद 111 हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. त्याने 7 वेळा  50 हून अधिक धावांचा आकडा पार केला आहे. दरम्यान सचिन तेंडुलकरने केलेल्या 971 धावानंतर रोहितच्या 883 धावांचा क्रमांक लागतो.

कर्णधार रोहित शर्माकडे रेकॉर्ड करण्याची संधी

त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माला आशिया चषकात एक खास विक्रम करण्याची संधी आहे. यंदा रोहित शर्मा आशिया कपमध्ये 1 हजार धावा पूर्ण करू शकतो. तसेच भारतीय कर्णधार सचिन तेंडुलकरचा 973 धावांचा विक्रम मोडू शकतो. याशिवाय रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज बनू शकतो. सध्या न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मार्टिनने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 3 हजार 497 धावा केल्या आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 3 हजार 487 धावा केल्यामुळे तो काही धावाच मार्टीनच्या मागे असून यंदा हा रेकॉर्ड नक्कीच तोडेल.  

27 ऑगस्टपासून सामन्यांना सुरुवात

आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, सुपर 4 साठी 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. 

आशिया चषकाचं संपूर्ण वेळापत्रक-

सामनादिवसदिनांकसंघग्रुप ठिकाण 
1शनिवार27 ऑगस्टअफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकाबीदुबई
2रविवार28 ऑगस्टभारत विरुद्ध पाकिस्तानदुबई
3मंगळवार30 ऑगस्टबांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान बीशारजाह
4बुधवार31 ऑगस्टभारत विरुद्ध पात्र संघदुबई
5गुरुवार1 सप्टेंबरश्रीलंका विरुद्ध बांग्लादेश बीदुबई
6शुक्रवार2 सप्टेंबरपाकिस्तान विरुद्ध पात्र संघशारजाह
7शनिवार3 सप्टेंबरग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4शारजाह
8रविवार4 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2सुपर 4दुबई
9मंगळवार6 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1सुपर 4दुबई
10बुधवार7 सप्टेंबरग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4दुबई
11गुरुवार8 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4दुबई
12शुक्रवार9 सप्टेंबरग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2सुपर 4दुबई
13रविवार11 सप्टेंबरसुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2सुपर 4दुबई

हे देखील वाचा-

Sanju Samson: 'मॅन ऑफ द मॅच' जिंकताच संजू सॅमसनची खास क्लबमध्ये एन्ट्री! यादीत धोनी अजूनही अव्वल 

Deepak Hooda: दिपक हुडा टीम इंडियासाठी ठरतोय लकी! सलग 16 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतानं मिळवलाय विजय