India Probable playing 11 : भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून स्वत:च्या नावे केली आहे. पण आता औपचारिकता म्हणून तिसरा सामना खेळवला जाणार आहे. अशामध्ये भारताला झिम्बाब्वेला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश देण्याची नामी संधी देखील आहे. अशामध्ये भारतीय संघ अंतिम 11 मध्ये एक बदल करण्याची शक्यता आहे.


हा बदल म्हणजे या मालिकेसाठी भारतीय संघाचं तिकिट मिळालेल्या राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याला संघात एन्ट्री मिळण्याची संधी आहे. भारताकडे सलामीवीर आणि यष्टीरक्षक अशा जबाबदाऱ्यांसाठी वेगवेगळे पर्याय असल्याने ईशानला आशिया कपसाठी विश्रांती दिल्याने. ईशान किशनच्या जागी राहुल खेळू शकतो. 


केएल राहुलच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष


तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष असेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतानं दहा विकेट्सनं विजय मिळवला. ज्यामुळं त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. तो फक्त एक धाव करून माघारी परतला. यामुळं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुल कशी कामगिरी बजावतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे, केएल राहुल आगामी आशिया चषकात भारतीय संघाचा भाग आहे. यापूर्वी त्याचं फॉर्ममध्ये परतणं भारतासाठी गरजेचं आहे. 


अशी असू शकते भारताची अंतिम 11


सलामीवीर - केएल राहुल आणि शिखर धवन


मिडिल ऑर्डर फलंदाज - दीपक हुडा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर) आणि ईशान किशन/राहुल त्रिपाठी. 


ऑलराउंडर- अक्षर पटेल


गोलंदाज - कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा. 


मालिकेसाठी कसे आहेत दोन्ही संघ?


भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.


झिम्बाब्वेचा संघ:
रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.


हे देखील वाचा-