World Cup 2023 : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, भारताची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
India vs England LIVE Score, World Cup 2023 : लखनौच्या इकाना स्टेडिअमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India vs England LIVE Score, World Cup 2023 : लखनौच्या इकाना स्टेडिअमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकात टीम इंडिया पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी करणार आहे. आतापर्यंतच्या पाच सामन्यात भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. लखनौच्या मैदानात भारत प्रथम फलंदाजी करणार आहे. नाणेफेकीनंतर बोलताना रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्यास उत्सुक असल्याचे म्हटलेय. कारण, आतापर्यंत विश्वचषकात प्रथम फलंदाजी केलेली नव्हती, त्याशिवाय खेळपट्टी प्रथम फलंदाजी करण्यास पोषक असल्याचेही रोहित शर्माने सांगितले.
संघात बदल केले का ?
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने आणि रोहित शर्मा यांनी सेम प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सांगितले. भारतीय संघात शामी, सिराज आणि बुमराह हे तीन वेगवान गोलंदाज असतील. तर जाडेजा आणि कुलदीप यांच्याकडे फिरकी जबाबदारी असेल.
भारताची प्लेईंग 11 -
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी
🚨 Toss and Team Update 🚨
— BCCI (@BCCI) October 29, 2023
England win the toss and elect to bowl in Lucknow.
A look at #TeamIndia's Playing XI 👌
Follow the match ▶️ https://t.co/etXYwuCQKP#CWC23 | #MenInBlue | #INDvENG pic.twitter.com/oIo82skT3v
इंग्लंडची प्लेईंग 11 -
जॉनी बेयरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, मोइन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वूड
खेळपट्टी कशी ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लखनौच्या इकाना स्टेडियमवर होत आहे. इकाना मैदानाची खेळपट्टी फिरकीला पोषक आहे. पण विश्वचषकातील सामन्यात ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांनाही मदत करत असल्याचे दिसतेय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना जुन्याच खेळपट्टीवर होत आहे. त्यामुळे फिरकीला मदत मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
गुणतालिकेतील दोन्ही संघाची स्थिती काय ?
जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला अतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाने पाच सामन्यात फक्त दोन गुणांची कमाई केली आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आहे. भारताने आपल्या पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास अव्वल स्थानावर पुन्हा झेप घेणार आहे.