ICC Womens World Cup 2022: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला 137 धावांनी पराभूत करून इंग्लंनं अंतिम सामन्यात धडक दिलीय. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी 3 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात ख्राइस्टचर्चच्या मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिज तर इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लजडी सोफी इक्लेस्टोन आणि दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल यांच्यात वाकयुद्ध झाल्याचे पाहायला मिळालं. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इंग्लंडच्या डावातील 50व्या षटकात शबनीम इस्माइलनं पहिल्याच चेंडूवर सोफी इक्लेस्टोन बाद केलं. दरम्यान, सोफी इक्लेस्टोन मैदान सोडत असताना शबनीमनं पंचांच्या डोक्यावरील चष्मा घेतला आणि चष्मा लावत जल्लोष साजरा केला. हे पाहून इक्लेस्टोन चिडली आणि शबनीम इस्माइल काहीतरी बोलली. त्याचवेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली.
व्हिडिओ-
विश्वचषकात इंग्लडंचं दमदार कमबॅक
महिला विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडच्या महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. येत्या 3 एप्रिल रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये अंतिम लढत होणार आहे. इंग्लंडनं तब्बल आठव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंड संघानं हा लागोपाठ पाचवा विजय मिळवला आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या तीन सामन्यात महिला इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे स्पर्धेबाहेर जाण्याची भीतीही निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर इंग्लंड संघाने आपला खेळ उंचावत एकापाठोपाठ एक विजय मिळवले. इंग्लंड संघाने आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंड संघाने आतापर्यंत चारवेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे.
हे देखील वाचा-
- Atish Todkar: जूनियर चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये आतिश तोडकरनं सुवर्णपदक पटकावलं
- LSG vs CSK : ...म्हणून आम्ही हारलो, रवींद्र जाडेजानं सांगितलं लखनौविरुद्ध पराभवाचं कारण
- KKR vs PBKS : आजची लढत केकेरआर विरुद्ध पंजाब किंग्स, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha