IPL 2022, LSG vs CSK : गुरुवारी रात्री झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (CSK vs LSG) यांच्यातील सामन्यात चेन्नईने 210 धावांचा मोठा स्कोर उभा करुनही त्यांना पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरलेल्या लखनौ संघाने त्यांना मात दिली आहे. दरम्यान या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) त्यांच्या पराभवामागील मुख्य कारण सांगितलं आहे.


जाडेजाने या पराभवामागे मैदानावर पडलेलं दव आणि खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे बलाढ्य अशा चेन्नई संघाला या हंगामात हा सलग दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. आधी सलामीच्या सामन्यात केकेआरने त्यांना 6 विकेट्सने मात दिली होती. त्यानंतर आता लखनौने 6 विकेट्सने मात दिली आहे. सामन्यानंतर बोलताना जाडेजा म्हणाल,''आम्ही सुरुवात चांगली केली होती. रॉबीन आणि शिवमने शानदार खेळ सुरु केला. पण क्षेत्ररक्षणात आम्ही खास झेल घेऊ शकलो नाही. खास क्षेत्ररक्षण न करता आल्याने सामन्यात आम्हाला नुकसान झालं'' 


लखनौ सहा विकेट्सनी विजयी


कर्णधार के.एल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्या तुफानी सलामीनंतर एविन लुईसच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर लखनौसंघाने 211 धावांचे आव्हान सहा गाडी राखून सहज पार केले. लखनौने 19.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉकचे आणि लुईस यांनी अर्धशतकी खेळी केली.  डिकॉकने 61 तर लुईसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर राहुलने 40 धावांची छोटेखानी खेळी केली. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लखनौचा हा पहिला विजय आहे. लखनौला पहिल्या सामन्यात गुजरातकडून पराभव स्विकारावा लागला होता. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. 


हे देखील वाचा-