Women's World Cup, ENG vs SA: महिला विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडच्या महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तीन एप्रिल रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये अंतिम लढत होणार आहे. इंग्लंड संघाने तब्बल आठव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंड संघाने हा लागोपाठ पाचवा विजय मिळवला आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या तीन सामन्यात महिला इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे स्पर्धेबाहेर जाण्याची भीतीही निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर इंग्लंड संघाने आपला खेळ उंचावत एकापाठोपाठ एक विजय मिळवले. इंग्लंड संघाने आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंड संघाने आतापर्यंत चारवेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. 


क्राइस्टचर्च येथे झालेल्या महिला विश्व कपमधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा 137 धावांनी पराभव केला. महिला इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धिरित 50 षटकांत 8 विकेटच्या मोबदल्यात 293 धावा केल्या होत्या. डॅनियल वॅटने शतकी खेळी करत संघाची धावसंख्या वाढली. वॅटने 125 चेंडूचा सामना करताना 12 चौकारांच्या मदतीने 129 धावा केल्या. इंग्लंड संघाची आघाडीची फळी कोलडल्यानंतर डॅनियल वॅट आणि डंकली (60) यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने 293 धावांपर्यंत मजल मारली. 


इंग्लंड संघाने दिलेल्या 294 धावांच्या आव्हानापुढे दक्षिण आफ्रिकेचा संघ 156 धावांपर्यंत मजल मारु शकला. दक्षिण आफ्रिका संघाला 50 षटकेही फलंदाजी करता आली नाही. इंग्लंड संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिका संघाचा डाव 38 षटकांत 156 धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना इंग्लंड संघाने तब्बल 137 धावांनी जिंकला आहे. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने 8 षटकांत 36 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अथवा एकही भागिदारी झाली नाही. दक्षिण आप्रिकाकडून मिग्नॉन डू प्रीज (30) ने सर्वाधिक धावा केल्या. 




ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल नवव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे, या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ अजेय आहे. 2017 मध्ये इंग्लंड संघाने भारताचा परभव करत विश्वचषक जिंकला होता. तर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट विंडिजचा परभव करत सहावे विजेतेपद जिंकले होते. आता तीन एप्रिल रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे.