IND vs ENG : बर्मिंघम कसोटीचा तिसरा दिवस ब्रुक- स्मिथ आणि आकाशदीप- सिराज यांनी गाजवला, भारताकडे 244 धावांची आघाडी
England vs India Test Day 3 : भारतानं इंग्लंड विरुद्ध 587 धावांचा डोंगर उभारल्यानंतर आकाशदीप आणि मोहम्मद सिराजनं दमदार कामगिरी केली आहे.
LIVE

Background
England vs India Test Day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील बर्मिंघम कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 64 धावा केल्या आहेत. भारताला पहिल्या डावातील 180 धावांची आघाडी मिळाली. या आघाडीच्या जोरावर भारतानं एकूण 244 धावांची आघाडी मिळवली. त्यापूर्वी इंग्लंडचा संघ 407 धावांवर बाद झाला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडची अवस्था 5 बाद 84 केली होती. त्यानंतर ब्रुक आणि स्मिथनं 300 धावांची भागीदारी केली. यानंतर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कमबॅक करत इंग्लंडला 407 धावांवर रोखलं. मोहम्मद सिराजनं 6 विकेट घेतल्या तर आकाशदीपनं 4 विकेट घेतल्या.
हॅरी ब्रुकनं 158 धावा केल्या आहेत. तर, जेमी स्मिथ यानं 184 धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंडचे एकूण 6 फलंदाज शुन्यावर बाद झाले. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जयस्वालनं 28 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर करुण नायर फलंदाजीला आला आहे. करुण नायर आणि के. एल. राहुल मैदानावर आहेत. भारताकडे आता एकूण 244 धावांची आघाडी आहे.
भारताला दुसऱ्या डावात पहिला धक्का, यशस्वी जयस्वाल 28 धावा करुन बाद
भारताला दुसऱ्या डावात पहिला धक्का बसला आहे. यशस्वी जयस्वालनं 28 धावा केल्या.
DSP मोहम्मद सिराजचा धमाका, 6 विकेट घेत इंग्लंडला रोखलं, जेमी स्मिथ नाबाद परतला
DSP मोहम्मद सिराजचा धमाका केला आहे. त्यानं 6 विकेट घेत इंग्लंडला रोखलं. दुसरीकडे इंग्लंडचा विकेटकीपर जेमी स्मिथ 184 धावांवर नाबाद राहत माघारी परतला. आकाशदीपनं 4 विकेट घेतल्या.




















