मुंबई इंडियन्स अन् आरसीबीकडून खेळलेल्या क्रिकेटपटूची अडल्ट साइटवर एन्ट्री, क्रिकेटविश्वात धुमाकूळ
Tymal Mills: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या इंग्लिश क्रिकेटपटूने अडल्ट साइटवर एन्ट्री केल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

Tymal Mills: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्सकडून (MI) खेळलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू टायमल मिल्स (Tymal Mills) याने 'Only Fans'या अडल्ट साईटवर अकाऊंट उघडल्याची माहिती समोर आली आहे. 'Only Fans'या अडल्ट साईटवर टायमल मिल्सला पाहून क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकित झाले आहेत. अशा साईटवर अकाऊंट उघडणारा टायमल मिल्स हा पहिला क्रिकेटपटू असल्याचे सांगण्यात येत आहे.
'Only Fans'या अडल्ट साईटवर अकाऊंट उघडल्यानंतर टायमल मिल्सने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना टायमल मिल्स म्हणाला की, मी हे हजार टक्के स्पष्ट करू इच्छितो की अकाउंटवर कोणतेही अश्लील फोटो किंवा ग्लॅमर फोटो शेअर केले जाणार नाहीत. याठिकाणी केवळ क्रिकेट आणि माझ्या जीवनाशी संबंधित गोष्टी असेल. हा एक नवा मार्ग आहे. मात्र त्यासाठी मी खूप उत्साहित आहे, असं टायमल मिल्सने सांगितले.
टायमल मिल्सने असा निर्णय का घेतला?
टायमल मिल्स पुढे म्हणाले, ओन्ली फॅन्स ही साईट पॉर्नसाठी ओळखली जाते. परंतु मी या साईटवर कोणतेही अश्लील फोटो शेअर करणार नाहीय. मी या साईटच्या माध्यमातून चाहत्यांशी थेट संवाद साधणार आहे. मी या प्लॅटफॉर्मचा वापर एक माध्यम म्हणून करू शकतो जिथे मी लोकांना क्रिकेटपटूच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट पैलूंबद्दल जागरूक करता येईल, असं टायमल मिल्सने स्पष्ट केले.
कोण आहे टायमल मिल्स? (Who is Tymal Mills?)
टायमल मिल्स हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. टायमल मिल्स डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने इंग्लंड क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. 2011 साली इंग्लंडमधील इसेक्स क्रिकेट क्लबमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये टायमल मिल्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या संघांकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. 2017 मध्ये RCB ने त्याला 12 कोटी रुपयांना विकत घेतले होते.




















